शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

‘महागडे’ स्वेटर खरेदीची निविदा रोखली

By admin | Updated: January 6, 2016 02:16 IST

राज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २१०० रुपये किमतीचे ‘महागडे’ वुलन स्वेटर खरेदीची निविदा रोखण्यात आली असून पूर्वीसारखे कॉटनमिक्स स्वेटरच देण्यात येतील

यदु जोशी, मुंबईराज्यातील शासकीय आश्रमशाळांमधील आदिवासी विद्यार्थ्यांसाठी २१०० रुपये किमतीचे ‘महागडे’ वुलन स्वेटर खरेदीची निविदा रोखण्यात आली असून पूर्वीसारखे कॉटनमिक्स स्वेटरच देण्यात येतील, असे आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी आज ‘लोकमत’ला सांगितले. दोन लाख आदिवासी विद्यार्थ्यांना हिवाळा संपल्यानंतर वूलनचे स्वेटर दिले जात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने मंगळवारच्या अंकात दिल्यानंतर आदिवासी विकास खात्यात खळबळ उडाली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वृत्ताची गांभीर्याने दखल घेत याबाबत मंत्री सावरा यांच्याकडे विचारणा केल्याचे समजते. आश्रमशाळांतील विद्यार्थ्यांसाठी प्रत्येकी १४०० ते २१०० रुपये दराने स्वेटर खरेदीसंबंधीची निविदा अंतिम होण्याच्या मार्गावर होती. मात्र सावरा यांनी मंगळवारी ती रोखली. त्यामुळे जवळपास ३० कोटींच्या खरेदीला चाप बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या स्वेटर खरेदीबाबत लोणावळ्यातील निसर्गरम्य ठिकाणी अर्थपूर्ण हालचाली झाल्या होत्या. मंत्री सावरा यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, स्वेटर खरेदीचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करेन. १०० टक्के वूलनचे स्वेटर देणे हे प्रॅक्टिकल नाही. यासाठी ड्रायक्लिनिंगची सोय आदिवासी पाड्यांवरील विद्यार्थी कुठून करणार? उपाय म्हणून पूर्वीप्रमाणेच वूलन-कॉटनमिक्स स्वेटर घ्यावे लागतील. या खरेदीसंबंधीच्या निर्णय व अंमलबजावणीत कालापव्यय होऊ देणार नाही.