शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ पैशांतून इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी

By admin | Updated: November 18, 2016 05:06 IST

मोठ्या रकमेतून बिटकॉइन चलनाद्वारे महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केल्याची बाब आता पुढे आली आहे.

पंकज रोडेकर/ ठाणेकॉल सेंटरमधील व्यवहारांद्वारे अमेरिकन नागरिकांकडून फसवणुकीने व जबरदस्तीने वसूल केलेल्या मोठ्या रकमेतून बिटकॉइन चलनाद्वारे महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंची खरेदी केल्याची बाब आता पुढे आली आहे. ही बाब सिद्ध करणे पोलिसांना शक्य झाले, तर या प्रकरणातील सूत्रधारांना जेरबंद करण्याकरिता सबळ पुरावे हाती लागतील, असे उच्चपदस्थ सूत्रांचे म्हणणे आहे.मीरा रोड येथील बहुचर्चित कॉल सेंटर घोटाळा प्रकरणात हवालाद्वारे पैशांचे व्यवहार केले गेले. या माध्यमातून प्राप्त झालेल्या मोठ्या रकमांचा विनियोग बिटकॉइन या चलनाचा वापर करून करोडो रुपयांची इलेक्ट्रॉनिक उपकरणे खरेदी करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे. इंटरनेटद्वारे बिटकॉइन चलनाचा वापर झालेला ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात उघडकीस येणारा बहुधा हा पहिलाच गुन्हा ठरणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.मीरा रोड येथील कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना धमकावून त्यांच्याकडून पैसे उकळण्यात येत असल्याची माहिती शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्र. १ ला मिळाल्यावर धाड टाकून पोलिसांनी तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अटक केली होती. तेथील संगणकही ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या चौकशीत या गुन्ह्याच्या वेगवेगळ्या राज्यांतील लिंकसमोर आल्या. आतापर्यंत ५० जणांना अटक केली असली तरी प्रमुख सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॉगी याच्यापर्यंत पोलिसांना पोहोचता आलेले नाही. मात्र, त्याने मैत्रिणीला खरेदी करून दिलेली कार पोलिसांनी जप्त केली आहे. कॉल सेंटर प्रकरणाचा तपास करताना हवाला आॅपरेटर्सची पोलिसांनी चौकशी केली. त्या वेळी पोलिसांना चक्रावून टाकणारी इंटरनेटच्या माध्यमातून बिटकॉइन चलनाद्वारे केल्या जाणाऱ्या खरेदी व्यवहारांची बाब उघड झाली. हे खरेदी व्यवहार उघड करण्यात पोलिसांना यश आले, तर त्याकरिता आणलेला पैसा कुठून प्राप्त झाला, याचा हिशेब या घोटाळ्यातील सूत्रधारांना द्यावा लागेल व त्यामुळे या प्रकरणातील तपास अधिक मजबूत होईल, असे पोलीस सूत्रांचे म्हणणे आहे.