शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

पंजाबच्या लिपिकास शिताफीने अटक!

By admin | Updated: January 30, 2017 04:08 IST

बोगस शस्त्र परवान्यांचे वाटप करणाऱ्या टोळीतील पंजाबमधील एका लिपिकास ठाणे पोलिसांनी शिताफीने अटक केली. दीड वर्षापासून फरार असलेल्या या आरोपीस पंजाबमध्ये ताब्यात घेताना

ठाणे : बोगस शस्त्र परवान्यांचे वाटप करणाऱ्या टोळीतील पंजाबमधील एका लिपिकास ठाणे पोलिसांनी शिताफीने अटक केली. दीड वर्षापासून फरार असलेल्या या आरोपीस पंजाबमध्ये ताब्यात घेताना, त्याने पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्नही केला. आरोपी ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडीत असून, या टोळीतील आणखी २५ आरोपींचा शोध सुरू आहे.ठाण्यातील एका रहिवाशास रिव्हॉल्व्हर देण्यासाठी आलेल्या निदानसिंग नावाच्या आरोपीस, जुलै २०१५ मध्ये ठाणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या माहितीवरून अटक केली होती. त्याच्या चौकशीतून बोगस शस्त्र परवाने वाटणाऱ्या टोळीची माहिती समोर आली होती. पंजाबमधील तरन तारन जिल्हाधिकारी कार्यालयातील लिपिक बलजित सिंग याचे नावही त्याच वेळी निष्पन्न झाले होते, परंतु तेव्हापासून तो फरार होता. मुंबई, ठाण्यातील काही व्यापाऱ्यांना जिल्हाधिकाऱ्यांची बोगस सही करून शस्त्र परवाने दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे. महाराष्ट्रासह पंजाब, तसेच जम्मू आणि काश्मिरातील अशाच प्रकारच्या टोळ्यांशी आरोपींचे लागेबांधे असल्याचेही तपासात समोर आले होते. गत दीड वर्षापासून फरार असलेला बलजित सिंग अमृतसरमध्ये असल्याची माहिती ठाण्याच्या गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार, सहायक पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी आणि इतर कर्मचाऱ्यांचे पथक बलजितच्या अटकेसाठी अमृतसरला गेले होते. बलजितला बेड्या ठोकून न्यायालयासमोर हजर केले असता, त्याला ३१ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. बलजितच्या अटकेने या प्रकरणात आतापर्यंत अटक आरोपींची संख्या १५ झाली आहे. या आंतरराज्य टोळीकडून ज्यांनी बोगस शस्त्र परवाने घेतले, त्यांचीही चौकशी केली जाणार आहे. त्यापैकी जे परवानाधारक टोळीच्या कारनाम्यांबाबत अनभिज्ञ असल्याचे चौकशीमधून स्पष्ट होईल, त्यांचा या प्रकरणात साक्षीदार म्हणून वापर केला जाईल. (प्रतिनिधी)