शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

पंजाब उपांत्य फेरीत--४० व्या अखिल भारतीय वीज मंडळ कबड्डी स्पर्धा

By admin | Updated: July 10, 2015 22:46 IST

महावितरण पराभूत : दिल्लीसह कर्नाटक, हरियाणाही अंतिम चारमध्ये

कोल्हापूर : दिल्ली बीएसईएस, कर्नाटक, पंजाब एस.पी., हरियाणा पीसीएल यांनी शुक्रवारी झालेल्या उपांत्यपूर्व फेरीत प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत ४० व्या अखिल भारतीय वीज क्रीडा कबड्डी स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. जिद्द आणि चुरशीचा खेळ करूनही यजमान महावितरणचा संघ बलाढ्य पंजाब संघाकडून हरला. आज, शनिवारी सकाळच्या सत्रात उपांत्य, तर सायंकाळी चार वाजता अंतिम फेरीतील सामना होणार आहे. कोल्हापुरात सुरू असलेल्या कबड्डी स्पर्धेत पहिला उपांत्यपूर्व सामना दिल्ली बीएसईएस विरुद्ध उत्तरप्रदेश या दोन संघांत झाला. अत्यंत अटीतटीच्या या सामन्यात उत्तर प्रदेशकडून अमितकुमार शर्मा याने उत्कृष्ट चपळ खेळ केला. मात्र, त्याची ही खेळी दिल्लीच्या खेळाडूंनी असफल ठरविली. दिल्लीकडून भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेल्या धिप्पाड संजीवकुमारने वेगवान चढाई करीत आपल्या संघास मोठी आघाडी मिळवून देत सामना २० गुणांनी जिंकून दिला. दुसरा सामना कर्नाटक विरुद्ध तेलंगणा यांच्यात झाला. हा सामना कर्नाटकने २९ विरुद्ध ९ गुणांनी जिंकला. तिसरा सामना बलाढ्य पंजाब एस. पी. विरुद्ध यजमान महावितरण यांच्यात झाला. तो अत्यंत अटीतटीचा आणि क्रीडारसिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा झाला. या सामन्यात महावितरणकडून अजय शिंदे, राहुल सणस, सुनील सावंत यांनी कडवी झुंज दिली; तर पंजाबकडून भूपिंदरसिंह, राजा यांनी उत्कृष्ट चढाई केली. सामन्यात पहिल्या हाफपर्यंत पंजाबचे १३, तर महावितरणचे १० गुण अशी स्थिती होती. दुसऱ्या हाफमध्ये २४ विरुद्ध १६ आणि अखेरच्या काही वेळात पंजाबचे २५ आणि महावितरणचे १९ गुण होते. अखेरच्या वेळेत पंजाबकडून भूपिंदरसिंह याने जोरदार चढाई करीत आपल्या संघाचे ३२ गुण करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेर हा सामना पंजाबने ३२ विरुद्ध २३ गुणांनी जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली.अखेरचा चौथा सामना हरियाणा पीसीएल विरुद्ध तमीळनाडू डीसीएल यांच्यात झाला. यात तमीळनाडूकडून पी. गणेशनने, तर हरियाणाच्या सज्जनकुमार, अनिलकुमार, सत्येनकुमार यांनी उत्कृष्ट चढाया व बचाव केला. हा सामना अत्यंत चुरशीचा झाला. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये हरियाणाचा १, तर तमीळनाडूचे ५ गुण होते. हरियाणाने खेळात आक्रमकता आणत अखेर हा सामना १५ विरुद्ध १३ गुणांनी जिंकत स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली. एका हाताच्या अमितकुमारची झुंज व्यर्थउत्तर प्रदेश संघातील आघाडीचा चढाईपटू व वयाच्या पाचव्या वर्षी गवत कापायच्या यंत्रात उजवा हात गमावलेल्या अमितकुमार शर्मा याने बलाढ्य दिल्ली संघाविरोधात जोरदार चढाया करीत त्यांना नाकीनऊ आणले होते. तो उत्तरप्रदेश वीज मंडळात लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्याने यापूर्वी अनेक राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या असून, तो कबड्डी घालताना प्रतिस्पर्धाच्या डोक्यावरून अचानक उडी मारण्यात तरबेज आहे. शुक्रवारी त्याने कबड्डीतील अनेक चाली दाखवीत उपस्थितांची वाहवा मिळविली. उपांत्य फेरीतील लढती अशापहिली लढत सकाळी नऊ वाजता कर्नाटक विरुद्ध दिल्ली यांच्यात, तर दुसरी लढत पंजाब विरुद्ध हरियाणा यांच्यात होणार आहे.