शहरं
Join us  
Trending Stories
1
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
3
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
4
Rahul Gandhi: राहुल गांधी यांना मोठा दिलासा, नागरिकत्वाबाबत दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली
5
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
6
PF Account मधून किती रक्कम तुम्ही काढू शकता? काय आहेत नियम आणि अटी
7
परीक्षेत नापास, आयुष्यात पास! दहावीत मुलगा फेल झाला तरी पालकांनी कापला केक, कारण...
8
गायीच्या शेणापासून बनवलेल्या रंगानेच सरकारी कार्यालये रंगवा; CM योगी आदित्यनाथ यांचे आदेश 
9
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
10
'गँग्ज ऑफ वासेपूर', 'दबंग' फेम प्रसिद्ध कलाकाराचं दुःखद निधन, बॉलिवूडवर पसरली शोककळा
11
"पाकिस्तानी आर्मी तिथल्या तरुणांना आवडत नाही", बॉलिवूड सिंगरचा दावा, म्हणाला- "ते म्हणाले की तुम्ही भाग्यवान..."
12
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
13
IPL 2025: यंदा आरसीबीनं ट्रॉफी जिंकली नाहीतर बायकोला घटस्फोट देणार; चाहत्याचा व्हिडीओ व्हायरल
14
उज्जैनच्या महाकाल मंदिरात भीषण आग, धुराचे लोट पाहून भाविकांनाही भरली धडकी!
15
बोगस शिक्षक भरती: जुने मुख्याध्यापक आणि अधिकारी म्हणतात, 'तो मी नव्हेच', बँक खाती गोठवले
16
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
17
लेक १६ वर्षांची झाल्यावर मराठी अभिनेत्रीने 'सेक्स टॉय' गिफ्ट म्हणून द्यायचा केला विचार, म्हणते...
18
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
19
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
20
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले

शिक्षेचा पंच

By admin | Updated: May 7, 2015 01:47 IST

रुपेरी पडद्यावर दबंगगिरी करणाऱ्या सुपरस्टार सलमान खानचा आजचा दिवस प्रचंड नाट्यमय घडामोडींचा ठरला. ‘हिट अ‍ॅन्ड रन’प्रकरणी सत्र न्यायालयाने दुपारी पाच वर्षे सशक्त कारावसाची शिक्षा ठोठावली़

> ‘हिट अँड रन’प्रकरणी सलमानला ५ वर्षे सक्तमजुरी> सत्र न्यायालयात  शिक्षा; हायकोर्टात मात्र लगेच २ दिवस जामीन>  शिक्षा सुनावताच सलमान आणि त्याच्या कुटुंबाला बसला जबरदस्त धक्का> दिवसभर रंगले नाट्य; कोर्टाच्या दिरंगाईमुळे तुरुंगवास तूर्तास टळलारुपेरी पडद्यावर दबंगगिरी करणाऱ्या सुपरस्टार सलमान खानचा आजचा दिवस प्रचंड नाट्यमय घडामोडींचा ठरला. ‘हिट अ‍ॅन्ड रन’प्रकरणी सत्र न्यायालयाने दुपारी पाच वर्षे सशक्त कारावसाची शिक्षा ठोठावली़ त्यानंतर सलमानच्या वकिलांनी धावपळ करीत उच्च न्यायालयाकडून दोन दिवसांचा अंतरिम जामीनही मिळविला. या तात्पुरत्या दिलाशानेही सलमानच्या चाहत्यांमध्ये पुन्हा उत्साह उसळला. दोन दिवसांनंतर उच्च न्यायालय या जामीन अर्जावर काय निर्णय देते, यावर पुन्हा सलमानचे भविष्य अवलंबून आहे. --------उच्च न्यायालयाच्या निर्णयाने सलमानला तुरुंगाची हवा खावी लागली नाही; पण तो आणखी किती दिवस तुरुंगवास टाळू शकतो, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. --------न्यायालयाने ड्रंकन ड्राइव्ह करणाऱ्या तळीरामांना शिक्षेचा चांगलाच पंच मारला. सलमानवरील शिक्षेचा निर्णयाने पुन्हा एकदा कायदा श्रेष्ठ ठरला. सोशल मीडियानेही न्यायालयाच्या निर्णयाचा आदर केला. ---------काय झाले सलमान आणि न्यायाधीश यांच्यातील संभाषण ?न्यायाधीश - घटना घडली तेव्हा तूच गाडी चालवत होतास, हे सिद्ध झाले आहे. जखमींपैकी एकाचा मृत्यू घटनास्थळी तत्काळ झाला आहे, क्रेन पडून त्याचा मृत्यू झालेला नाही. तसेच घटना घडली तेव्हा तुझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्सही नव्हते. त्यामुळे सदोष मनुष्यवधासह भरधाव गाडी चालवणे, दारू पिऊन निष्काळजीपणे गाडी चालविणे या गुन्ह्यांसाठी तुला दोषी ठरविण्यात आले आहे. यावर तुझे काही म्हणणे आहे का?सलमानने यावर आपली प्रतिक्रिया दिली. मात्र तो खूपच हळू बोलत होता. त्या वेळी न्यायालयातही गोंधळ होता. त्यामुळे त्याने काय प्रतिक्रिया दिली, हे उपस्थितांना कळू शकले नाही.न्यायाधीश - अपघात प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने आतापर्यंत दिलेले निकाल व कायद्यातील तरतुदींनुसार तुला पाच वर्षांचा सश्रम कारावास ठोठावला जात आहे. भरधाव गाडी चालवणे व विनापरवाना गाडी चालवणे यासाठीही सहा-सहा महिन्यांची शिक्षा व दंड ठोठावला जात आहे. मात्र याआधी तू उच्च न्यायालयात नुकसानभरपाईपोटी १९ लाख रुपयांची रक्कम भरल्याने स्वतंत्र दंड ठोठावलेला नाही.सलमानने यावर काहीच प्रतिक्रिया दिली नाही, केवळ मान फिरवली. न्यायालयात उपस्थित त्याच्या चाहत्यांनी मात्र बाप रे, शीट... अशा प्रतिक्रिया नोंदवल्या.------------काळवीट शिकारीचा निकाल बाकी !‘हिन अ‍ॅण्ड रन’प्रकरणी पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेल्या सलमानवर आणखी एक संकट कायम आहे. जोधपूरमधील कांकणी गावात आॅक्टोबर १९९८मध्ये ‘हम साथ साथ हैं’ चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान काळवीटांची शिकार केल्याचा सलमानवर आरोप आहे. सलमानला या प्रकरणात राजस्थानमधील कनिष्ठ न्यायालयाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने या शिक्षेला स्थगिती देत सलमानला दिलासा दिला खरा; मात्र सर्वोच्च न्यायालयाने ही स्थगिती उठवत फेरविचार करून पुन्हा सुनावणी घेण्याचे आदेश दिले. कोर्टाच्या या आदेशानुसार राजस्थान उच्च न्यायालयात याप्रकरणी पुन्हा सुनावणी सुरू झाली आहे. या सुनावणीत उच्च न्यायालय काय निकाल देणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.----------

दिवसभरातील नाट्यमय घडामोडी9:45 निकालासाठी सलमानने ‘गॅलेक्सी’ निवास सोडले़10:35 सत्र न्यायालयात सलमान खान हजर 11:00 विशेष सरकारी वकील प्रदीप घरत न्यायालयात आले़11:05 न्यायालयाने सलमान दोषी असल्याचे केले जाहीऱ11:15 सलमानच्या शिक्षेविषयी बचाव पक्षाचा युक्तिवाद सुरू11:50 बचाव पक्षाचा युक्तिवाद पूर्ण11:55 सरकारी पक्षाचा युक्तिवाद सुरू12:25 सरकारी पक्षाचा युक्तिवाद पूर्ण01:15 न्यायालयाने सलमानला शिक्षा ठोठावली़04:00 उच्च न्यायालयात सुनावणी सुरू05:15 उच्च न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर07:20 न्यायालयातून सलमान घराकडे रवाना