शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

भितीदायक स्वप्न पडत असल्याने पुण्यातील तरुणाची आत्महत्या

By admin | Updated: August 13, 2016 14:36 IST

सतत पडणा-या भितीदायक स्वप्नांना कंटाळून एमबीएच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

एमबीएचा विद्यार्थी : वडगाव बुद्रुकमध्ये घडली घटना
ऑनलाइन लोकमत
पुणे : सतत पडणा-या भितीदायक स्वप्नांना कंटाळून एमबीएच्या विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. वडगाव बुद्रुकमध्ये घडलेली ही घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. त्याने लॅपटॉपमध्ये लिहून ठेवलेल्या सुसाईट नोटवरुन आत्महत्येमागील कारण स्पष्ट झाले आहे. 
संकेत राजाराम कामठे (वय 24, रा. दांगट गार्डन सोसायटी,  वडगाव बुद्रकु, सिंहगड) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड पोलिसांनी अकस्मित मृत्यूची नोंद केली आहे. एकुलता एक मुलगा असलेला संकेत कोथरुडमधील एमआयटी महाविद्यालयात एमबीएच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता.  तसेच कोंढव्यातील एनआयबीएममध्ये नोकरीही करीत होता. त्याचे आईवडील घरीच असतात. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, त्याला अर्धशिशीचा त्रास होता. त्यामुळे त्याने डोके सारखे दुखायचे. यासोबतच त्याला नेहमी भितीदायक स्वप्नं पडत असत. यामुळे त्याला त्रास होत असल्याचे त्याने अनेकदा कुटुंबियांना सांगितले होते. शनिवारी सकाळी आठच्या सुमारास वडिलांनी त्याच्या खोलीचे दार उघडले. मात्र, काहीच प्रतिसाद मिळाला नाही. बराच वेळ दरवाजा उघडला न गेल्याने त्यांनी पोलीस नियंत्रण कक्षात फोन करुन मदत मागितली. सिंहगड रस्ता पोलिसांनी अग्निशामक दलाच्या जवानांची मदत घेऊन दरवाजा तोडला. 
त्यावेळी गळफास घेतलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह आढळून आला. संकेतने लॅपटॉपवर सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्याचा मोबाईलमध्येही फोटो काढून ठेवलेला होता. या नोटमध्ये त्याने  ‘मला भयानक स्वप्न पडत होते. त्यामुळे मी अनेकदा दचकून उठायचो. मला त्याचा खूप त्रास होत आहे. माझ्या आईवडीलांना त्रास देऊ नये. सॉरी आई-पप्पा.’ असे त्याने लिहून ठेवले आहे.