शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

स्वीडनसाठी पुणे औद्योगिक व गुंतवणुकीचे ‘हब’

By admin | Updated: February 15, 2016 04:09 IST

डनसाठी पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडनचे मोठे योगदान असून, याद्वारे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील,

पुणे : स्वीडनसाठी पुणे हे औद्योगिक आणि गुंतवणुकीचे ‘हब’ आहे. ‘मेक इन इंडिया’ मोहिमेमध्ये स्वीडनचे मोठे योगदान असून, याद्वारे दोन्ही देशांतील आर्थिक संबंध अधिक दृढ होतील, असे स्वीडनचे पंतप्रधान स्टीफन लोफव्हेन यांनी सांगितले.मुंबईतील ‘मेक इन इंडिया’ सप्ताहानिमित्त भारतात आलेले पंतप्रधान लोफव्हेन यांनी शनिवारी चाकण येथील ‘एमआयडीसी’तील ‘टेट्रा पॅक’ आणि ‘एरिक्सन‘ या स्वीडिश कंपन्यांच्या प्रकल्पांना भेट दिली. त्यानंतर दोन्ही प्रकल्पांतील अधिकारी व माध्यमांच्या प्रतिनिधींशी त्यांनी संवाद साधला. या वेळी स्वीडनचे भारतातील राजदूत हॅरॉल्ड सँडबर्ग, महाराष्ट्र, गुजरात आणि गोवा विभागासाठीच्या स्वीडिश कॉन्सुलर जनरल फ्रेड्रिका आॅर्नब्रांट, स्वीडिश चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष आणि ‘टेट्रा पॅक’ साउथ आशिया मार्केट्सचे व्यवस्थापकीय संचालक कंदर्प सिंग, एरिक्सनचे भारत विभागप्रमुख पाओलो कोलेला व अध्यक्ष मॅट्स ओलसन आदी उपस्थित होते. लोफव्हेन म्हणाले, ‘भारताने ‘मेक इन इंडिया’च्या माध्यमातून खूप चांगला पुढाकार घेतला आहे. भारतातील उत्पादनवाढ खूप महत्त्वाची आहे.’ (प्रतिनिधी)