शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

‘आर्ची’ला पाहण्यासाठी पुणेकर ‘सैराट’

By admin | Updated: July 19, 2016 01:17 IST

सैराटमधली आर्ची वडगावमध्ये येणार आहे, असे समजल्यावर सिंहगड रस्त्यावरुन जाणारे जरा थबकतच होते.

पुणे : सैराटमधली आर्ची वडगावमध्ये येणार आहे, असे समजल्यावर सिंहगड रस्त्यावरुन जाणारे जरा थबकतच होते. काहीजण जागा मिळेल तेथे वाहने लावून कालव्याच्या कडेने धावत सुटले. अखेर ती आली. रिमझिम पावसात तिने स्वत: एक झाड लावून वृक्षारोपणाचा प्रारंभ केला. तिच्याभोवती जमलेल्या शेकडो जणांनी तिची अदा मोबाईलमध्ये टिपली आणि आनंदात न्हाऊन निघाले.मुठा कालव्यालगतच्या रिकाम्या जागेत अतिक्रमण व्हायला नको म्हणून स्थानिक नगरसेवक विकास दांगट पाटील, पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाचे शंतनू जगदाळे यांनी त्या जागेत वृक्षारोपण करण्याचा निर्णय घेतला. दांगट पाटील यांनी नागराज मंजुळे व सैराटमधील कलावंतांना निमंत्रण दिले. चाहत्यांची जास्त गर्दी नको म्हणून निमंत्रितांनाच या कार्यक्रमाला बोलावले. मात्र ही बातमी फुटलीच.त्या गाडी भोवती प्रचंड गर्दी जमली. नागराज, पिंकू, आरबाज शेख, उर्फ सल्या यांना पाहण्यासाठी लोक महामार्ग उड्डाणपुलावरही थांबले. फन टाईम थिएटरसमोरही वाहतूक कोंडी होऊ लागली. चाहत्यांच्या सततच्या कोंडाळ्यामुळे, अतिउत्साहामुळे संयोजकांना भाषणे आटोपावी लागली.नागराज मंजुळे यांनी मोजक्या शब्दांत वृक्षारोपणाचा संदेश दिला.प्रत्येकाचे मोबाईल तेव्हा हे दृश्य टिपत होते. एक रोप या कलावंतांच्या हस्ते लावल्यानंतर चाहत्यांच्या गर्दीतून आर्चीला बाहेर काढताना संयोजकांची पुरती दमछाक झाली. अखेर कलावंतांना कसेबसे वाहनात बसवून रवाना करण्यात आले. (प्रतिनिधी)>सकाळी अकरा वाजता कार्यक्रमस्थळी, उड्डाणपुलाखालच्या भागात गर्दी व्हायला सुरुवात झाली. महापौर, उपमहापौर, वात्रटिकाकार रामदास फुटाणे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अनेक नगरसेवक, कार्यकर्ते उपस्थित झाले. तरुण मुलामुलींसह लहान मुले मोठ्या संख्येने कालव्याच्या भरावावर येऊ लागले. सर्व जण आर्चीला शोधत होते. पावसाच्या धारा अधूनमधून कोसळत होत्या. तासभर प्रतिक्षा झाल्यानंतर साडेबारा वाजता तिला, पिंकू राजगुरुला घेऊन येणारी गाडी आली. पोलिस दक्ष झाले.