शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पुणे : विश्रांतवाडी ते संगमवाडी बीआरटी मार्ग आज बंद

By admin | Updated: June 28, 2016 17:19 IST

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.29) रोजी पुणे मुक्कामी दाखल होत आहे. आळंदी रस्त्याने विश्रांतवाडी ते संगमवाडी या

ऑनलाइन लोकमत

पुणे, दि. २८ -  संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा बुधवारी (दि.29) रोजी पुणे मुक्कामी दाखल होत आहे. आळंदी रस्त्याने विश्रांतवाडी ते संगमवाडी या मार्गावरून हा सोहळा शहरात येणार असल्याने या मार्गावरील बीआरटी सेवा दिवसभर बंद ठेवण्यात येणार आहे. वारक-यांची सुरक्षा लक्षात घेऊन हा मार्ग बंद ठेवण्याच्या सूचना पुणे महापालिकेने पीएमपी प्रशासनास केल्या होत्या. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती पीएमपीकडून देण्यात आली. दरम्यान, पालखी पुण्यात आल्यानंतर मार्गावर येणा-या वारक-यांची संख्या लक्षात घेऊन पुढील रात्री काही फे-या करण़्यात येणार असल्याचेही पीएमपी कडून स्पष्ट करण्यात आले आहे.मागील वर्षी पालखी सोहळयादरम्यान, हा बीआरटी मार्ग बंद होता. त्यानंतर सप्टेंबर 2015 मध्ये या मार्गाचे उद्घाटन करण्यात आले होते. त्यानंतर या मार्गावर पीएमपीचे नियमित संचलन सुरू आहे. दरम्यान, पालखी मार्गावरच बीआरटीची स्वतंत्र लेन आहे. त्यामुळे पालखी बरोबर येणारे वारकरी या लेनमधूनच पुढे संगमवाडी पर्यंत येतात. त्यामुळे या मार्गात बस सेवा सुरू ठेवल्यास अपघातांची शक्यता आहे. या शिवाय या मार्गावर वॉर्डन अथवा वाहतूक पोलिसांची नेमणूक केली तरीही अनेक ठिकाणी मार्गात जाण्यासाठी रस्ता असल्याने वारकरी मार्गात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या मार्गावरील सर्व संचलन संपूर्ण दिवसभर बंद ठेवण्याचा निर्णय पीएमपीने घेतला आहे. पालखी सोहळा शहरात आल्यानंतर मार्गावरील गर्दीची शक्यता लक्षात घेऊन पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे पीएमपीकडून स्पष्ट करण्यात आले. दरम्यान, पालखी कालावधीत विश्रांतवाडी मधून शहरात इतरत्र होणारे संचलन फाईव्ह नाईन चौकातून येरवडा, पुणे स्टेशन, स्वारगेट,महापालिका भवन, हडपसरसाठी सुरू ठेवण्यात येणार असल्याचे पीएमपी प्रशासनाकडून सांगण्यात आले.