शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
3
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
6
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
7
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
8
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
9
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
10
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
11
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
12
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
13
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
14
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
15
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
16
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
17
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
18
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
19
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
20
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले

पुण्याला स्वाइन फ्लूचा विळखा; सात वर्षांत तब्बल ४६० बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2017 00:38 IST

राज्यात स्वाइन फ्लूचा उगम झालेल्या पुणे शहरात गेल्या सात वर्षांत तब्बल ४६० रुग्णांचा एच१एन१च्या विषाणूने बळी घेतला आहे.

पुणे : राज्यात स्वाइन फ्लूचा उगम झालेल्या पुणे शहरात गेल्या सात वर्षांत तब्बल ४६० रुग्णांचा एच१एन१च्या विषाणूने बळी घेतला आहे. थंड हवामानात सक्रीय होणारा हा विषाणू ऐन उन्हाळ्यातही धोकादायक ठरत आहे. यामुळेच गेल्या दीड महिन्यांपासून शहरात स्वाइन फ्लूच्या साथीचे थैमान सुरूच आहे. हवामानातील बदलाबरोबरच स्वाइन फ्लूच्या विषाणूंमध्ये बदल होत असल्याचे महापालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. स्वाइन फ्लूचा पहिला रुग्ण आॅगस्ट २००९ मध्ये पुण्यामध्ये सापडला. या साथीचा देशातील पहिला बळी देखील पुण्यातच गेला. त्यानंतर स्वाइन फ्लूसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर पुण्याची दखल घेतली गेली. गेल्या सहा-सात वर्षांत पुणे आणि स्वाइन फ्लू हे एक दुदैवी समीकरणच बनले आहे. स्वाइन फ्लूच्या साथीबाबत असलेली अपूर्ण माहिती, त्यावरील उपचार व प्रभावी लसीचा अभाव यामुळे पहिल्याच वर्षी स्वाइन फ्लूमुळे शहरात ५९ रुग्णांचा बळी केला. त्यानंतर सन २०१० मध्ये उग्र रूप धारण केले. प्रशासनाच्या पातळीवर सर्व प्रकारच्या उपयाययोजना करूनदेखील साथ आटोक्यात आणण्यास अपयश आल्याने तब्बल ११० रुग्ण दगावले गेले. त्यानंतर सन २०११ ते २०१४ दरम्यान काही प्रमाणात स्वाइन फ्लूचे विषाणू कमी सक्रीय असल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. परंतु त्यानंतर २०१५ मध्ये स्वाइन फ्लूच्या विषाणूंचा पुन्हा उद्रेक झाला. पूर्वीपेक्षा अधिक क्षमतेने रुग्णांवर आक्रमण केले. यामुळे सन २०१५ या एका वर्षात शहरामध्ये तब्बल १५३ रुग्णांचा स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झाला. यानंतर पुन्हा दोन वर्षे ही साथ काही प्रमाणात नियंत्रणात ठेवण्यात यश आले. गेल्या काही वर्षांत पुणे आणि स्वाइन फ्लू हे दुर्दैवी समीकरणच बनले आहे. दर दोन-तीन वर्षांनी एच१एन१ विषाणू सक्रीय होत असल्याचे मागली सात वर्षांतील आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे. यंदा पुन्हा स्वाइन फ्लूच्या साथीने कहर केला असून, चार महिन्यांत शहरामध्ये तब्बल २९ रुग्णांचे बळी केले आहेत. (प्रतिनिधी)>आरोग्य विभाग सतर्कशहरामध्ये गेल्या चार महिन्यांत स्वाइन फ्लूचे तब्बल २९ बळी गेले असून, हवामानातील प्रचंड तफावत यामुळे हा विषाणू अधिक सक्रीय झाला आहे. परंतु गेल्या आठ दिवसांत रुग्णांची संख्या पुन्हा कमी झाली असून, महापालिकेकडे स्वाइन फ्लू प्रतिबंधक लस पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहे. शासनाकडून या लसीचे ३ हजार ७०० डोस महापालिकेला देण्यात आले असून, आतापर्यंत अडीच हजार डोसचे वाटप करण्यात आले आहे. तसेच टॅमी फ्लूच्या गोळ्या सर्व महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच सर्व ठिकाणी स्क्रिनिंगची सुविधादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. स्वाइन फ्लूचा शहरातील वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन आरोग्य विभागाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.- अंजली साबणे, प्रभारी उपआरोग्य प्रमुख>विषाणूंमध्ये होतोय बदलगेल्या एक-दीड महिन्यांत सकाळी प्रचंड थंडी व दुपारी उन्हाचा तडाखा हवामानातील ही तफावत स्वाइन फ्लूच्या एच१एन१ च्या विषाणू सक्रीय होण्यासाठी अत्यंत पोषक वातवारण असते. त्यात गेल्या काही वर्षांत या विषाणूंमध्ये काही प्रमाणात बदल होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबत नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ व्हायरॉलॉजी (एनआयव्ही) च्या वतीने संशोधन सुरू आहे. या विषाणूंमध्ये होणारे बदल लक्षात घेऊन एनआयव्हीमध्ये नवीन लस तयार करण्याचे काम सुरू आहे. ही लस मे अखेरपर्यंत उपलब्ध होईल. यामुळे सध्या उपलब्ध असलेली लस मोठ्या प्रमाणात खरेदी करता येत नाही. मे महिन्यानंतर नवीन लसीचाच पुरवठा करण्यात येणार आहे.- एच. एच. चव्हाण, आरोग्य उपसंचालक>वर्षाला दोन वेळा होतो स्वाइन फ्लूचा उद्रेकगेल्या सहा-सात वर्षांत स्वाइन फ्लूच्या साथीचा अभ्यास केला असता वर्षात साधारण दोन वेळा एच१एन१ विषाणूंचा उद्रेक होत असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये जानेवारी ते एप्रिल हा पहिला तर जुलैनंतर दुसरा टप्पा असल्याचे निष्कर्ष आरोग्य विभागाने काढले आहे. यामध्ये मे ते जून दरम्याने संसर्गाचे प्रमाण कमी असल्याचे अभ्यासानुसार स्पष्ट होते. सात वर्षांतील रुग्ण व गेलेले बळीवर्ष रुग्णांची संख्या बळी२००९१४९५५९२०१०१६५५११०२०११२१०१२०१२७३०४१२०१३२७५४६२०१४३५११२०१५११२६१५३२०१६२९१०२०१७ (६ एप्रिल)१८१२९