शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

पुण्यात युवासेना शहराध्यक्षावर कोयत्याने प्राणघातक हल्ला

By admin | Updated: November 6, 2014 03:31 IST

शिवसेनेच्या युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगावशेरी येथे ही घटना घडली

पुणे : शिवसेनेच्या युवा सेनेचे पुणे शहराध्यक्ष नितीन भुजबळ यांच्यावर अज्ञात दोन व्यक्तींनी प्राणघातक हल्ला केला. बुधवारी सकाळी अकराच्या सुमारास वडगावशेरी येथे ही घटना घडली. यात ते गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत़ राजकीय वैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा आरोप नितीन भुजबळ यांनी केला आहे़ नितीन गोविंंद भुजबळ (३२) हे बुधवारी सकाळी सनसिटीतून विमान नगरमधील कार्यालयाकडे चालकासमवेत कारमधून निघाले होते. ते वृंदावन सोसायटीजवळ आले असता एका हल्लेखोराने मोबाइलवर बोलण्याचा दिखावा करीत त्यांच्या कारला दुचाकी आडवी लावली. हॉर्न वाजवूनही तो रस्त्याच्या बाजूला झाला नाही. त्यामुळे नितीन कारमधून उतरून त्याच्याशी बोलू लागले. त्याचवेळी अचानक दुसऱ्या व्यक्तीने पाठीमागून येऊन त्यांच्यावर कोयत्याने वार केले. त्यात नितीन जखमी होऊन चालकाशेजारील सीटवर कोसळले. प्रसंगावधान राखत चालकाने कार पुढे काढली. नितीन हे जखमी अवस्थेतच शास्त्रीनगरमधील येरवडा पोलीस ठाण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पाटील यांनी त्यांना तात्काळ पोलिसांसमवेत खासगी रुणालयात रवाना केले. भुजबळ यांची प्रकृती स्थिर असून, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)