शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-सोलापूर मार्गाच्या कामांची चौकशी

By admin | Updated: July 21, 2016 04:33 IST

निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल

मुंबई : पुणे-सोलापूर दरम्यानच्या राष्ट्रीय महामार्गाच्या निकृष्ट कामाची चौकशी करून कंत्राटदारावर कारवाई करण्याबाबत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत दिले. या महामार्गाच्या कामातील त्रुटी दूर करण्यासंदर्भात आणि नव्याने कुठल्या सुविधा देता येतील या बाबत संबंधित लोकप्रतिनिधींची बैठक आपण अधिवेशन संपल्यानंतर एक महिन्याच्या आत घेऊ, असे आश्वासन पाटील यांनी दिले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बाबतचा मूळ प्रश्न विचारला होता. हा रस्ता अनेक ठिकाणी खराब झाला असल्याचा व कामे निकृष्ट झाल्याचा आरोप त्यांनी केला. मूळ आराखड्यानुसार या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. मात्र, अनेक कामे व्हायची असून नव्याने काही गोष्टी करणे आवश्यक असल्याचे अजित पवार, राहुल कुल, जयंत पाटील, राणा जगजितसिंह यांनी सांगितले. कंत्राटदारावर कारवाईची मागणी त्यांनी केली. तसेच, कामे अपूर्ण असूनही टोल का आकारला जात आहे असा सवालदेखील केला. पन्नास वर्ष टिकणे अपेक्षित असलेला रस्ता जर फक्त तीन वर्षांत खराब होत असेल, तर दोषी कंत्राटदारावर कारवाई झाली पाहिजे, असे त्यांचे म्हणणे होते. त्यावर कंत्राटदाराची चौकशी आणि कारवाईचे आश्वासन देत त्याबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन मंत्रीमहोदयांनी दिले. (विशेष प्रतिनिधी)।भविष्यात कोणत्याही रस्त्याचे काम शंभर टक्के पुर्ण झाल्याशिवाय टोल वसुली केली जाणार नाही, अशी तरतूद टोल विषयक धोरणात करण्याचे आश्वासन पाटील यांनी दिले.