शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - द्रुतगती मार्गावर प्रवाशाला मारहाण करुन लुटले

By admin | Updated: July 8, 2017 21:31 IST

खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशाची द्रुतगती महामार्गावर किवळे येथे मारहाण करून लुबाडणूक करण्यात आली

ऑनलाइन लोकमत
वाकड (पुणे), दि. 8 - खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने निघालेल्या प्रवाशाची द्रुतगती महामार्गावर किवळे येथे मारहाण करून लुबाडणूक करण्यात आली. ही घटना वाकड ते किवळे या हद्दीत घडली. प्रवाशाचे दागिने, रोख रक्कम लुटली, जबर मारहाण करून त्या जखमी अवस्थेत प्रवाशाला मोटारीतून खाली उतरविले. रात्री दीडच्या सुमारास जखमी अवस्थेत हा प्रवासी धडपडत किवळे येथे पोहोचला. तेथे गेल्यानंतर त्यांनी देहूरोड पोलिसांना घडलेली हकीकत सांगितली. देहूरोड पोलिसांनी फिर्याद दाखल केली़ अज्ञातांविरुद्ध दाखल झालेला हा गुन्हा दुसºया दिवशी हिंजवडी पोलिसांकडे वर्ग करण्यात आला.  
 
आणखी वाचा
दरवर्षी खचतोय काटवली घाट
काँग्रेसच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर शेअर झाली पॉर्न क्लिप
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारहाणीत जखमी झालेल्या इसमाचे नाव विशाल गोपीचंद आहुजा (वय ३४, रा. पिंपळे सौदागर) असे आहे. मुंबई-बंगळुरू द्रुतगती महमार्गावर वाकड ते किवळेच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास घटना घडली. याबाबत देहूरोड पोलिसांनी स्थानिकांनी दिलेल्या माहिती वरून शून्य क्रमांकाने गुन्हा दाखल करून ८ जुलैला हिंजवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे. आहुजा काही कामानिमित्त सोमवारी एकच्या सुमारास मुंबईला निघाले होते़ वाकड पुलावर मुंबईला जाण्यासाठी थांबले असता एक मोटार तेथे थांबली. मुंबईला जायचे असेल तर मोटारीत बसा असे सांगून आहुजा यांना मोटारीत बसविले.    
  
द्रुतगती मार्गावर निर्जनस्थळी येताच मोटार थांबविण्यात आली़ मोटारीतील व्यक्तींनी त्यांच्याकडील रोख रक्कम काढून घेतली. सोन्याचे  दागिनेही घेतले. तीस हजार सातशे रुपयांचा ऐवज जबरदस्तीने हिसकावून घेत त्यांना मारहाण केली. अहुजा यांना द्रुतगती मार्गावर मध्येच सोडून लुटारू मोटारीतून मुंबईच्या दिशेने पसार झाले. अहुजा हे जखमी अवस्थेत ४ ते ५ किलोमीटर पायी चालत किवळेपर्यंत आले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने ते येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले. त्यानंतर त्यांनी देहूरोड पोलिसांकडे फिर्याद दिली. ८ जुलैला हा गुन्हा देहूरोड पोलीस ठाण्याकडून हिंजवडी पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला.