शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - सिंहगड रस्त्यावरील नदीजवळील सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी

By admin | Updated: August 3, 2016 19:47 IST

खडकवासला धरणातून तब्बल ३१ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याने मुठा नदीला मोठा पूर आला आहे.

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. ३ - खडकवासला धरणातून तब्बल ३१ हजार क्युसेक्सने पाणी सोडले जात असल्याने मुठा नदीला मोठा पूर आला आहे. सिंहगड रस्त्यावरील नदीपात्रालगतच्या सोसायट्यांमध्ये पुराचे पाणी शिरले आहे. अग्निशमन दलाच्या वतीने रहिवाशांना घराबाहेर काढण्यासाठी रेस्क्यु आॅपरेशन सुरू करण्यात आले आहे. पानशेत धरणही पूर्ण भरल्याने येत्या काही तासांत हा विसर्ग ५० हजार क्युसेक्सवर जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुराचा  धोका आणखी वाढणार आहे. धरणक्षेत्रात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे बुधवारी सकाळपासून विसर्गाला सुरूवात करण्यात आली. सुरूवातीला १० हजार क्युसेक्स वेगाने पाणी सोडले जात होते. परंतु, खडकवासला आणि पानशेत धरणाच्य पाणलोट क्षेत्रात संततधार सुरूच आहे. परिसरातील ओढ्या-नाल्यांना पूर आले असून मोठ्या प्रमाणात पाणी धरणांमध्ये येत आहे. पूरनियंत्रणासाठी पाटबंधारे विभाागाने टप्या-टप्याने विसर्गामध्ये वाढ केली. दुपारी चार वाजल्यापासून ३१, ६०० क्युसेक्सने पाणी सोडण्यात येत आहे. त्याचबरोबर खडकवासला धरणाच्या खालील बाजूस असलेल्या ओढ्या-नाल्यांचे पाणीही नदीमध्ये येत आहे. पानशेत धरणही भरल्याने त्यातूनही पाणी सोडावे लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे खडकवासला धरण मोकळे करण्यासाठी आताचा विसर्ग ५० हजार क्युसेक्सवर जाणार आहे. हरित न्यायाधिकरणच्या आदेशानंतर मुठा नदीपात्रात बांधलेली संरक्षक भिंत पाडून टाकण्यात आली आहे. त्यामुळे सिंहगड रस्त्यावर नदीपात्रात असलेल्या सोसायट्यांमध्ये पाणी शिरण्यास सुरूवात झाली आहे. नदीपात्रात टाकलेला राडारोडा, अतिक्रमणे यामुळे साधारणत: ४० हजार क्युसेक्सनंतरच पूराचे प्रमाण वाढणार आहे. त्यामुळे अनेक सोसायट्या पाण्याखाली जाण्याची भीती आहे. अग्निशमन दलाने मदतकार्य सुरू केले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात येत आहे.