शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-पिंपरीची मेट्रो निविदेच्या मार्गावर

By admin | Updated: February 28, 2017 01:56 IST

महापालिका निवडणुकीत भरभरून मते दिलेल्या पुणेकरांचे मेट्रो चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे

पिंपरी : महापालिका निवडणुकीत भरभरून मते दिलेल्या पुणेकरांचे मेट्रो चे स्वप्न पुर्ण करण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. एकूण मेट्रो मार्गापैकी ५० टक्के मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पुर्ण करून महामेट्रो या कंपनीने पिंपरी- चिंचवड ते रेंजहिल्स या पहिल्या १० किलोमीटरच्या मार्गाच्या निविदाही काढल्या आहेत. रेंजहिल्सपासून पुढे हा मार्ग थेट स्वारगेटपर्यंत आहे. त्याही कामाच्या निविदा काढण्याची तयारी प्रशासकीय तयारी सुरू आहे.भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पुणे मेट्रो चे भूमीपूजन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर केले. त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्यावर टीका केली. त्यानंतर बरेच महिने काहीच होत नसल्याने काँग्रेस व राष्ट्रवादीकडून होत असलेल्या टीकेला धार चढली होती. प्रत्यक्ष निवडणुकीत पुणेकरांनी भाजपाला भरघोस मतांनी निवडून दिले. आता केंद्र, राज्य व महापालिका अशा तिन्ही ठिकाणी भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे पुणेकरांच्या अपेक्षा वाढल्या असून त्या पुर्ण करण्यासाठी भाजपाने मेट्रोचे पहिले पाऊल टाकले आहे.राज्यातील नागपूर व पुणे येथील मेट्रो च्या कामासाठी महामेट्रो ही स्वतंत्र कंपनी स्थापन करण्यात आली आहे. या कंपनीला पुण्याच्या कामात गती आणण्याच्या सुचना केंद्र व राज्य सरकारने दिल्या आहेत. त्यानुसार काम सुर झाले असून पहिल्या १० किलोमीटर मार्गाचे भौगोलिक सर्वेक्षण पुर्ण झाले आहे. याच मार्गाच्या कामाची निविदा जाहीर करण्यात आली आहे. रेंजहिल्स पर्यंतच्या या मार्गावर अन्य मार्गाच्या तुलनेच वाहतूक व अन्य अडचणी कमी आहेत. त्यामुळेच या मार्गाची निवड करण्यात आली आहे. एक महिना मुदतीची ही निविदा आहे. त्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करून दोन ते तीन महिन्यात या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.रेंजहिल्सच्या पुढचा स्वारगेट पर्यंतचा मेट्रो चा मार्ग संपुर्ण भुयारी आहे. त्यासाठी भूसंपादन, वाहतूक नियोजन व अन्य बऱ्याच गोष्टी कराव्या लागणार आहेत. निविदा जाहीर करण्यापासून ते प्रत्यक्ष काम सुरू होईपर्यंत व नंतर ते पुर्ण होईपर्यंतही त्याला बराच कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळेच सध्या सोप्या असलेल्या मार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र व राज्य सरकारनेच तशी सुचना कंपनीला केली असल्याची माहिती मिळाली. नागपूर मेट्रो चे काम बरेच पुढे गेले आहे. पुण्याचे कामही तसेच गतीने करावे असे कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकांना सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)>अडचण झाली दूर...मेट्रो च्या नदीपात्रातून जाणाऱ्या मार्गाला काही स्वयंसेवी संस्था संघटनांनी हरकत घेतली होती. ते प्रकरण राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणात आहे. आता बांधकाम विकास नियंत्रण नियमावलीत बदल केल्यामुळे ती अडचण दूर झाली असल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे नदीपात्राचेही सर्वेक्षण करण्यात आले असल्याची माहिती मिंळाली.एक महिना मुदतीची ही निविदा आहे. त्यानंतर प्रशासकीय सोपस्कार पुर्ण करून दोन ते तीन महिन्यात या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल.