शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा प्रश्न लागणार मार्गी ?

By admin | Updated: March 30, 2017 00:12 IST

पुणे-नाशिक रेल्वेचा खूप दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे.

वाकी : पुणे-नाशिक रेल्वेचा खूप दिवसांपासून प्रलंबित असणारा प्रश्न आता मार्गी लागणार असल्याचे दिसत आहे. याच रेल्वेमार्गासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे. तो पुणे- नाशिक महामार्ग क्र. ५०च्या पश्चिम बाजूने होणार असून हा रेल्वेमार्ग पुणे-नाशिक महामार्गाला समांतर होणार आहे. अशी माहिती शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार शिवाजी आढळराव-पाटील यांनी दिली. खेड तालुक्यात विमानतळ न झालेल्या स्थानिक लोकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात नाराजी दिसून येत होती. शुक्रवारी (दि. २४) सुरू झालेल्या या सर्वेक्षणामुळे तालुक्यात आनंदाचे वातावरण तयार झाले आहे. संबंधित रेल्वेचा मार्ग तळेगावहून थेट चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा अशा प्रकारे पुणे जिल्ह्यातून ५ महत्त्वाची स्थानके असणार आहेत.महाराष्ट्रातील विद्येच माहेरघर असणारा पुणे जिल्हा, नगर जिल्हा, तसेच नाशिक जिल्हा या ३ जिल्ह्यांच्या विकासाला भरभराटी येणार आहे. चाकण व इतर औद्योगिक परिसरातील कामगार, ग्रामीण भागातून पुण्यासारख्या शहरात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अर्थात विद्यार्थ्यांना खूप मोठा फायदा होणार आहे. तालुक्यातील बराचसा भाग हा डोंगराळ असल्याने डोंगरी भागाचा विकास होईल तसेच संबंधित रेल्वेमार्ग झाल्याने तालुक्यातील तरुण सुशिक्षित वर्ग तसेच इतर सर्वच वर्गांतील जनतेला रोजगाराच्या संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होऊन संबंधित विभागाचा मोठ्या प्रमाणावर विकास होऊन लोकांना दळणवळणाला फायदा होईल. हा रेल्वेमार्ग लवकरात लवकर मार्गी लावून त्याचा प्रश्न लवकर सोडवावा, अशी आशा व्यक्त होत आहे.२०९ : संबंधित रेल्वेमार्ग हा २०९ किलोमीटर अंतराचा असणार आहे. पाच वर्षांपूर्वी या मागार्ला मंजुरी मिळाली होती. १,८९३ : तेव्हाचे अंदाजपत्रक सुमारे १,८९३ कोटी रुपयांचे होते. २,४२५ : मागील वर्षीच्या अंदाजपत्रकात रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी २,४२५ कोटी रुपये मंजुरी दिली होती. २६५ : आधीच्या सर्वेक्षणामुळे हा मार्ग एकूण २६५ किलोमीटर इतका होता. ५६ : नव्याने केलेल्या या सर्वेक्षणात सुमारे ५६ किलोमीटर अंतरात कपात झाली आहे. आधीचा व आत्ताचा रेल्वे सर्वेक्षण मार्गआधीचा मार्ग : पुणे- देहूरोड- तळेगाव- चाकण- राजगुरूनगर- पाबळ- निरगुडसर- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- संगमनेर- सिन्नर- नाशिक.आताचा सुरू केलेला सर्वेक्षण मार्ग पुणे- देहूरोड- तळेगाव- चाकण एमआयडीसी- वाकी- राजगुरूनगर- पेठ- मंचर- नारायणगाव- आळेफाटा- संगमनेर- सिन्नर- नाशिक असा आहे.हा महामार्ग पुणे-नाशिक महामार्ग क्र.५० च्या पश्चिम बाजूने असेल.