शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

पुणे महापालिकेत भाजप कार्यकर्त्यांचा राडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2017 03:06 IST

स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून मंगळवारी महापालिकेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा केला.

पुणे : स्वीकृत नगरसेवक पदाच्या निवडीवरून मंगळवारी महापालिकेमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी प्रचंड राडा केला. भारतीय युवा मोर्चाचे पदाधिकारी गणेश घोष यांचा अगदी शेवटच्या क्षणी पत्ता कट करून माजी गटनेते गणेश बिडकर यांच्या नावाची स्वीकृतसाठी घोषणा करण्यात आली. यामुळे संतप्त झालेल्या घोष व त्यांच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेतील पक्ष कार्यालयाबरोबरच सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. महापालिकेच्या स्वीकृत सदस्यपदाच्या पाच जागांसाठी निवड होणार आहे. मंगळवारी दुपारी ३ ते ४ ही अर्ज दाखल करण्यासाठीची मुदत होती. संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला तीन जागा आल्या आहेत. पक्षनेत्यांकडून यासाठी गोपाळ चिंतल, रघुनाथ गौडा आणि गणेश घोष यांची नावे निश्चित करण्यात आली होती. यामुळे घोष कार्यकर्त्यांसह अर्ज भरण्यासाठी महापालिकेत उपस्थित होते. उमेदवारी अर्ज अंतिम करण्याबाबत भिमाले यांच्या कार्यालयात चर्चा सुरु होती. त्यावेळी भाजपच्या प्रदेश कार्यालयातून फोन आला. माजी गटनेते गणेश बीडकर यांना अर्ज भरण्यास सांगण्यात आले. यामुळे घोष यांचा ताबाच सुटला. भिमाले यांच्या समोर असलेल्या उमेदवारांच्या नावाची फाईलच त्यांनी खिडकीतून फेकून दिली. त्यानंतर कार्यकर्त्यांनी भिमाले यांच्या कार्यालयातील कुलर, टी पॉय, खुर्चा व दाराच्या काचा फोडल्या. बीडकर यांनाही धक्काबुकी करण्यात आली. त्यामुळे बीडकर यांचे कार्यकर्तेही संतप्त झाले. बीडकर आणि घोष यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी सुरू झाली. कार्यकर्त्यांनी पक्ष कार्यालयाची तोडफोड करत संताप व्यक्त केला. दरम्यान, बीडकर यांना त्यांच्या कार्यकर्त्यांनी सुरक्षा कडे करून अर्ज भरण्यासाठी आयुक्त कार्यालयात सुखरूप पोहचवले. यामध्ये घोष जखमी झाल्याने त्यांना पुना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. भिमाले यांनाही धक्काबुकी करण्यात आली. त्यांच्या हाताला काच लागल्याने दुखापत झाली. या प्रकारानंतर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त बोलविण्यात आला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना बाहेर काढून घटनेचा पंचनामा केला. (प्रतिनिधी)