शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मनपामध्ये ११ गावांचा समावेश; राज्य सरकारचे हायकोर्टात प्रतिज्ञापत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2017 02:35 IST

फुरसुंगी व उरळी या दोन गावांबरोबरच नऊ गावांचा अंशत: डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने

- लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : फुरसुंगी व उरळी या दोन गावांबरोबरच नऊ गावांचा अंशत: डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पुणे महापालिकेमध्ये समावेश करण्यात येणार आहे. तर उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात येईल, अशी माहिती राज्य सरकारने एका पत्राद्वारे उच्च न्यायालयाला बुधवारी दिली. पुणे भोवतालच्या ३४ गावांचा महापालिकेत समावेश करावा, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आल्या होत्या. या याचिकांवरील सुनावणी न्या. अभय ओक व न्या. विभा कंकणवाडी यांच्या खंडपीठापुढे होती.बुधवारच्या सुनावणीत सरकारी वकील मनीष पबाळे यांनी न्यायालयात सरकारचे एक पत्र सादर केले. महापालिकेचे डम्पिंग ग्राउंड उरळी व फुरसुंगी येथे आहे. या दोन गावांचा आणि यापूर्वी महापालिकेत अंशत: समाविष्ट असलेल्या तथापि काही अंशी महापालिकेत समाविष्ट नसलेल्या नऊ गावांचा डिसेंबर २०१७ अखेरपर्यंत पूर्णत: महापालिकेत समावेश करण्यात येईल. त्यासंदर्भात डिसेंबर २०१७ अखेरीस अंतिम अधिसूचना काढण्यात येईल, असे पत्रात म्हटले आहे. तसेच उर्वरित २३ गावांचा टप्प्याटप्प्याने पुणे महापालिकेत समावेश करण्यात येईल, त्यासाठी तीन वर्षांचा कालावधी लागेल, असेही राज्य सरकारने पत्रात म्हटले आहे. पाण्याची उपलब्धता, पाणी योजना, कचऱ्याचे नियोजन, रिंगरोड इत्यादी बाबींचा विचार करून या गावांचा पुणे मनपात समावेश करण्यात येईल, असे सरकारने स्पष्ट केले. सरकारच्या या निर्णयानंतर न्यायालयाने या याचिका निकाली काढल्या. सरकारच्या या निर्णयामुळे उर्वरित २३ गावांना आणखी तीन वर्षे प्रतीक्षा करावी लागणार आहे.