शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

पुणे मेट्रोला ब्रेक लागणार

By admin | Updated: January 3, 2017 04:50 IST

पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या मार्गावरील नदीपात्रातील प्रस्तावित बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली

पुणे : पुणे मेट्रो प्रकल्पाचे भूमिपूजन होऊन प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली असतानाच हरित न्यायाधीकरणाने वनाझ ते रामवाडी या मार्गावरील नदीपात्रातील प्रस्तावित बांधकामाला अंतरिम स्थगिती दिली. यामुळे मेट्रोच्या कामात पुन्हा अडथळा निर्माण झाला आहे. मात्र नदीपात्रातील बांधकाम वगळता मेट्रो प्रकल्पाची इतर कामे करण्यास कोणताही अटकाव केलेला नाही. या याचिकेची पुढील सुनावणी २५ जानेवारी रोजी होणार आहे.पुणे मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात वनाझ ते रामवाडी व पिंपरी ते स्वारगेट या दोन मार्गांवरून मेट्रो धावणार आहे. वनाझ ते रामवाडी हा मार्ग १४ किमी लांबीचा आहे, त्यापैकी केवळ डेक्कन ते डेंगळे पुलापर्यंतच्या १.७ किमीचा मार्ग नदीपात्रातून जात आहे. मेट्रो मार्ग नदीपात्रातून नेला जाऊ नये यासाठी खासदार अनु आगा, सारंग यादवाडकर, आरती किर्लोस्कर यांनी हरित न्यायाधीकरणापुढे याचिका दाखल केली आहे. न्यायमूर्ती यू. डी. साळवी व डॉ. अजय देशपांडे यांनी सोमवारीच्या सुनावणीत नदीपात्रात मेट्रोचे कोणतेही बांधकाम करण्यास अंतरिम स्थगिती दिली. तसेच मेट्रोची उभारणी करणाऱ्या महाराष्ट्र मेट्रो कॉर्पोरेशनला या खटल्यात प्रतिवादी करून घेण्याचेही निर्देश हरित न्यायाधीकरणाने दिले आहेत. मेट्रोचा पहिला आराखडा तयार करण्यात आला होता, तेव्हा ती जंगली महाराज रस्त्यावरून जाईल असे दर्शविण्यात आले होते, मात्र यास विरोध झाल्याने त्यामध्ये बदल करून मेट्रो नदीपात्रातून नेण्यात आली. मात्र नदीपात्रात बांधकाम झाल्याने पर्यावरणाची हानी होणार असल्याचे स्पष्ट करीत पर्यावरणवाद्यांनी हरित न्यायाधीकरणापुढे याचिका दाखल केली. अ‍ॅड. असीम सरोदे यांनी याचिकाकर्त्यांच्या वतीने बाजू मांडली. सध्याची स्थगिती हंगामी असली तरी आता या याचिकेच्या निकालावर वनाझ ते रामवाडी या मार्गाचे भवितव्य अवलंबून आहे. जर न्यायाधीकरणाने नदीपात्रातून मेट्रो नेण्यास मनाईचा निर्णय दिला तर संपूर्ण आराखड्यात बदल करावा लागेल. (प्रतिनिधी)