शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
महिलेला आंटी म्हणणं त्याला पडलं महागात, बोलावले पोलिस, कोर्टाने ठोठावला लाखोंचा दंड
6
कारचा तिसरा गियर कधी टाकावा? जाणून घ्या योग्य स्पीड अन् गियर बदलण्याची पद्धत, वाचवा इंधन
7
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
9
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
10
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
11
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
12
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
13
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
14
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
15
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
16
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
17
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
18
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
19
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
20
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
Daily Top 2Weekly Top 5

पुणे-कोल्हापूर संघर्ष यात्रा २१ नोव्हेंबरपासून प्रारंभ

By admin | Updated: November 8, 2015 00:27 IST

डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुमारे पन्नास डाव्या व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ

पुणे : डॉ. नरेंद्र दाभोळकर, कॉ. गोविंद पानसरे व एम.एम. कलबुर्गी यांच्या हत्येच्या निषेधार्थ सुमारे पन्नास डाव्या व पुरोगामी संघटनांनी एकत्र येत सामाजिक अत्याचार प्रतिबंधक चळवळ व जातीमुक्ती आंदोलन हाती घेतले आहे. आंदोलनात राज्यात २१ ते २४ नोव्हेंबरला संघर्ष यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती चळवळीचे राज्य नियंत्रक अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. डॉ. दाभोळकर यांची हत्या झालेल्या विठ्ठल रामजी शिंदे पुलावरून ही यात्रा सुरू होणार आहे. मारेकरी व सूत्रधारांना सामाजिक बळाचे दर्शन घडविण्यासाठी ही यात्रा काढण्यात येणार आहे. स्वत:ला हिंदुत्ववादी म्हणविणाऱ्यांनीच समाजातील वेगवेगळ््या प्रश्नांवर लढणाऱ्यांवर हल्ले करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या हिंसेला प्रोत्साहन देणाऱ्या आणिहिंसेचा उपदेश देणाऱ्या पद्धतीचे लिखाण करणाऱ्या सनातनप्रभात संस्थेवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी व त्यांच्याव्यवहाराची चौकशी करण्याच्या उद्देशाने ही संघर्ष यात्रा आणि सभा होणार आहे. कोल्हापुरात सभा घेण्याचे नियोजन आहे. डॉ. भारत पाटणकर, प्रा. गौतमीपुत्र कांबळे, उदय भगत, किशोर ढमाले, किशोर जाधव, विजय कुलकर्णी पत्रपरिषदेला उपस्थित होते. (प्रतिनिधी)