शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पुणे हे भारताचे डेट्रॉइट

By admin | Updated: February 15, 2015 00:34 IST

अभियांत्रिकीच्या संधी तसेच औद्योगिकीकरणामुळे भारताचे पुणे शहर हे भारताचे डेट्रॉईट (अमेरिकेतील औद्योगिक शहर) म्हणून उदयास येत आहे, असे गौरोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी : संरक्षणविषयक अभ्यासक्रम सुरू व्हावेतपुणे : अभियांत्रिकीच्या संधी तसेच औद्योगिकीकरणामुळे भारताचे पुणे शहर हे भारताचे डेट्रॉईट (अमेरिकेतील औद्योगिक शहर) म्हणून उदयास येत आहे, असे गौरोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले.चाकण एमआयडीसी फेज २ मधील जनरल इलेक्ट्रॉनिक्सच्या नवीन ब्रिलियंट फॅक्टरीचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झाले, त्या वेळी ते बोलत होते. या प्रसंगी राज्यपाल सी. एच. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय पर्यावरण राज्यमंत्री प्रकाश जावडेकर, पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट, खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील, जीईचे उपाध्यक्ष जॉन जी. राईस, जीईचे दक्षिण आशिया विभागाचे अध्यक्ष वनमाळी अगरवाल उपस्थित होते. मोदी म्हणाले, भारतात औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच सरंक्षण क्षेत्रातील उद्योग विकसित करण्याची क्षमता आहे. यासाठी लागणारी सामग्री देशात उपलब्ध आहे. आज भारत जगातील शस्त्र खरेदी करणारा देश असला, तरी देशांतर्गत शस्त्रास्त्र उद्योगाला चालना दिल्यास कमी किमतीत शस्त्रनिर्मिती करून तिसऱ्या जगातील देशांना त्यांची विक्री करता येणे शक्य आहे. यासाठी कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी संरक्षणविषयक अभ्यासक्रम आवश्यक आहेत.खासगी उद्योगांना यात समाविष्ट करण्यासाठी या क्षेत्रात ४९ टक्के गुंतवणूक करण्याला परवानगी देण्यात आली आहे. देशाने केलेल्या प्रगतीमुळे जगाचा भारताकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. जल, जमीन, तसेच नभ या क्षेत्रांतील उद्योग विकसित करण्यासाठी मोठ्या संधी आहेत. देशाला लाभलेल्या विस्तीर्ण सागरी किनाऱ्यामुळे जहाजबांधणी उद्योगातही गुंतवणूक होणे अपेक्षित आहे. या उद्योगाला चालना मिळाल्यास, या परिसरातील तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. (प्रतिनिधी)महाराष्ट्राचा इतरांनी आदर्श घ्यावा एकेकाळी महाराष्ट्र औद्योगिक विकास महांमडळातील लालफितीच्या कारभारामुळे १०० ते १२० प्रकप्ल प्रलंबित राहत होते. मंजुरीसाठी चार-चार वर्षे वाट पाहावी लागत होती. मात्र, महाराष्ट्रात आलेल्या देवेंद्र फडणवीस यांच्या नवीन सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन ही संख्या २० -२५ वर आणली आहे. भविष्यात ही संख्या आणखी कमी करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. महाराष्ट्राने उद्योगांना दिलेली चालना इतर राज्यांपुढे आदर्श ठेवणारी आहे, असे गौरवोद्गार नरेंद्र मोदी यांनी काढले.