शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे परराष्ट्र मंत्री पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर; भारतीय अधिकाऱ्यांसमोर मोठा पेच, कारण काय?
2
पुण्यात पुन्हा दहशतवादी?; ATS आणि पुणे पोलिसांकडून कोंढवा परिसरात रात्रभर सर्च ऑपरेशन
3
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
4
आजचे राशीभविष्य-९ ऑक्टोबर २०२५: आनंदोत्सव साजरा करण्याचा दिवस; व्यवसाय-नोकरीत होईल लाभ!
5
दोन शिवसेनेतल्या सततच्या भांडणांचा फायदा कोणाला?
6
संपादकीय: दिलासा तूर्त, चिंता शाश्वत! कर्जमाफीचा उच्चार न करता दिलेले पॅकेज...
7
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
8
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
9
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
10
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
11
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
12
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
13
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
14
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
15
आता स्मार्ट चष्म्याने पाहा, बोला अन् पैसे द्या; फोनशिवाय अन् पिन न टाकता करता येणार व्यवहार 
16
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
17
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
18
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
19
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
20
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना

पुणे - महिला शौचालयात घुसून आक्षेपार्ह फोटो काढणा-याला अटक

By admin | Updated: April 27, 2017 11:44 IST

शौचालयात घुसून महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 27 -  शौचालयात घुसून महिलांचे आक्षेपार्ह फोटो काढणा-या तरुणाला पोलिसांनी अटक केली आहे. पुण्यातील वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील ही घटना आहे. खासगी कंपनीत काम करणारी 26 वर्षीय तरुणी शौचालयात गेली असता एक तरुण तिथे लपून मोबाईल फोनच्या सहाय्याने आक्षेपार्ह फोटो घेत असल्याचं तिच्या लक्षात आलं. यानंतर तरुणीने पुणे पोलिसांनी महिलांच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या "बडी कॉप" अॅपच्या सहाय्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. राजकमल यादव असं या आरोपीचं नाव असून तो मुळचा बिहारचा आहे. 
 
तरुणी वर्ल्ड ट्रेड सेंटरमधील कॉमर्स सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनीतील एचआर विभागात काम करते. "कंपनीची महत्वाची मीटिंग असल्याने महिला कर्मचा-यांसहित सर्वांनाचा उशिरापर्यंत थांबायचं होतं. रात्री 9.45 दरम्यान तरुणी वॉशरुममध्ये गेली. महिला वॉशरुममध्ये गेली असता कोणीतरी आपल्याला लपून पाहत असल्याचा भास झाला. तिने पाहिलं असता राजकमल यादव तिचे फोटो काढण्याचा प्रयत्न करत होता", अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पाथरुडकर यांनी दिली आहे. 
 
अनिल पाथरुडकर यांनी सांगितलं की, "यानंतर तरुणीने धाव घेत अलार्म वाजवण्याचा आणि ओरडत मदत मागण्याचा प्रयत्न केला. आरोपीने तरुणीचा हात पकडत छेडण्याचाही प्रयत्न केला. कसंतरी तरुणीने स्वत:ची सुटका करुन घेतली आणि वॉशरुममधून पळून गेली. तरुणीने सुरक्षारक्षकांकडे धाव घेतली आणि सर्व प्रकार सांगितला. यानंतर बडी कॉप" अॅपच्या सहाय्याने पोलिसांना कळवलं. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला अटक केली.