शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

पुणे विमानतळावर सात किलो सोने पकडले

By admin | Updated: January 10, 2015 00:46 IST

पुणे विमानतळाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहामध्ये तस्करीचे सात किलो सोने मिळून आले असून, त्याची किंमत १ कोटी ९२ लाख रुपये आहे.

पुणे : पुणे विमानतळाच्या पहिल्या मजल्यावरील स्वच्छतागृहामध्ये तस्करीचे सात किलो सोने मिळून आले असून, त्याची किंमत १ कोटी ९२ लाख रुपये आहे. सीमाशुल्क विभाग आणि विमानतळ प्रशासनाला मिळालेल्या माहितीच्या आधारे शुक्रवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली.सीमाशुल्क विभागाचे आयुक्त वसा शेषगिरी राव यांनी दिलेल्या माहितीनुसार, शारजाह येथून येणाऱ्या स्पाईस जेट विमानामधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांकडून सोन्याची तस्करी होण्याची शक्यता असल्याची माहिती सीमाशुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार सर्वांना सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले होते. मिळालेल्या माहितीच्या आधारे विमानतळाच्या इमारतीमध्ये शोध मोहीम राबवल्यानंतर पहिल्या मजल्यावर असलेल्या स्वच्छतागृहात काळ्या रंगाच्या चिकटपट्टीमध्ये गुंडाळलेले सात किलो सोने मिळून आले. १ कोटी ९२ लाख रुपये किंमत असलेल्या या सोन्याची शासकीय व्हॅल्युअरकडून तपासणी करून घेण्यात आली. हे सोने परदेशी बनावटीचे असून, त्याची शुद्धता ९९.५ टक्के आहे.प्रवासी सोने घेऊन पुण्यात आल्यानंतर हे सोने स्वच्छतागृहात ठेवून विमानतळावरच काम करणारा एखादा कर्मचारी ते ताब्यात घेऊन बाहेर जाण्याची पद्धती कार्यरत असण्याची शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तवली आहे. विमानतळामध्ये काम करणारा कोणी या प्रकरणाची शहानिशा करण्यात येत असल्याचे राव यांनी सांगितले.