शहरं
Join us  
Trending Stories
1
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
2
राहुल गांधी अचानक ‘पीएमओ’त; पंतप्रधान माेदींसाेबत झाली बैठक
3
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला
4
चोंडीमध्ये आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक; विकास आराखड्यावर होईल शिक्कामोर्तब
5
पुतीन यांचा पंतप्रधान मोदी यांना फोन;  पहलगाम कट रचणाऱ्यांना सोडू नका
6
‘ती’ लईच हुशार ! यंदाही एक पाऊल पुढेच; ३८ महाविद्यालयांना मिळाला भाेपळा
7
प्राची ! पेट्रोलपंपावर काम करून कष्टाने गाठली यशाची उंची
8
अक्षय शिंदे चकमक प्रकरणाची चौकशी, डीजीपींनी एसआयटी नेमावी : कोर्ट
9
मुंबईकरांना दिलासा, पाणीपुरवठ्यात कपात नाही
10
२० वर्षांपूर्वी बांगलादेशमधून तो आला; नवी मुंबईतील महिलेशी संसार थाटला 
11
नवजात अर्भकांचे लसीकरण प्रसूती विभागातच करा; राज्य सरकारच्या सूचना, लागू होणार नवे नियम
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

पुण्याचा अभिषेक डोगरा ‘नीट’मध्ये राज्यात प्रथम

By admin | Updated: June 24, 2017 04:39 IST

वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत पंजाबचा नवदीप सिंग हा देशात पहिला आला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे/नवी दिल्ली : वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत (सीबीएसई) घेण्यात आलेल्या ‘नीट’ परीक्षेत पंजाबचा नवदीप सिंग हा देशात पहिला आला असून, पुण्याच्या अभिषेक डोगराने देशात पाचवा तर राज्यात पहिला क्रमांक पटकावला आहे. देशातील सुमारे ४७० वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये ६५,१७० एमबीबीएस व २५,७३० बीडीएसच्या जागांसाठी, तसेच इतर वैद्यकीय अभ्यासक्रमांमध्ये प्रवेशासाठी नीट घेण्यात आली होती. त्याचा निकाल ८ जून रोजी अपेक्षित असताना, मद्रास उच्च न्यायालयाने दिलेल्या स्थगितीमुळे निकाल लांबणीवर पडला होता. मागील आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने निकालाला हिरवा कंदील दाखविल्यानंतर शुक्रवारी आॅनलाइन निकाल जाहीर करण्यात आला. पुण्याच्या अभिषेकने ७२० पैकी ६९१ गुण मिळविले आहेत. विदर्भातील अकोल्यामधील विक्रम काटे हा राज्यात दुसरा आला आहे. ओबीसी प्रवर्गातून तो राज्यात पहिला आहे. विक्रमने ७२० पैकी ६७३ गुण पटकावले आहेत. लातूरमधील राजर्षी शाहू महाविद्यालयाचा विवेक विठ्ठल शामंते हा अनुसूचित जमाती संवर्गातून ६०० गुण मिळवून देशात ५ वा आला आहे. पुण्यातीलच ऋचा हेर्लेकर हिने ६८० गुणांसह देशात ३३ वा क्रमांक मिळविला आहे. देशभरातून ११ लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी ६ लाख ११ हजार ५३९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. या परीक्षेतही मुलींनीच बाजी मारली असून, उत्तीर्ण झालेल्यांमध्ये ३ लाख ४५ हजार ३१३ विद्यार्थिनी आहेत. उत्तीर्ण मुलांची संख्या २ लाख ६६ हजार २२१ आहे. देशात मध्य प्रदेशातील अर्चित गुप्ता हा दुसऱ्या क्रमांकावर तर मनिष मूलचंदानी तिसऱ्या क्रमांकावर आहे. देशात पहिला आलेला नवदीप सिंग हा पंजाबमधील मुक्तसरचा असून, त्याने नीटमध्ये ९९.९ पर्सेंटाइल मिळवले आहेत. त्याचे वडील सरकारी शाळेत मुख्याध्यापक आहेत. उपलब्ध जागांच्या तुलनेत उत्तीर्ण झालेल्यांची संख्या खूपच मोठी आहे. त्यामुळे उत्तीर्ण झालेल्या प्रत्येकाला वैद्यकीय वा दंतवैद्यक अभ्यासक्रमाला प्रवेश मिळण्याची चिन्हे कमीच असल्याची माहिती सूत्रांनी दिली.