शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
4
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
5
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
6
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
7
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
8
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
9
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
10
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
11
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
12
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
13
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
14
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
15
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
16
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
17
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
20
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
Daily Top 2Weekly Top 5

पुणेरी पाट्यांतून उमेदवारांना फटके

By admin | Updated: February 13, 2017 00:44 IST

पुणेरी पाट्या भल्याभल्यांच्या टोप्या उडवितात. विविध पक्षांच्या टोप्या घालून नागरिकांच्या दारात येणाऱ्या उमेदवारांच्या टोप्या उडवून पुणेरी पाट्यांनीही प्रचारात

पुणे : पुणेरी पाट्या भल्याभल्यांच्या टोप्या उडवितात. विविध पक्षांच्या टोप्या घालून नागरिकांच्या दारात येणाऱ्या उमेदवारांच्या टोप्या उडवून पुणेरी पाट्यांनीही प्रचारात आघाडी घेतली आहे. पुणेरी पाट्या हे पुणेरी संस्कृतीचे एक व्यवच्छेदक लक्षण मानले जाते. त्यामुळे निवडणुकीच्या धामधूमीत अनेक पुणेरी पाट्या शहरात पाहायला मिळत आहेत. पुण्यामध्ये सगळेच पक्ष स्वबळावर लढत असल्याने निवडणुकीच्या रिंगणात एकूण पाच उमेदवार आहेत. त्यांचे प्रभागातील चौघे मिळून २० उमेदवार होतात. याशिवाय अपक्ष म्हणून रिंगणात असलेले वेगळेच. त्यामुळे सतत दारावरची बेल वाजत असल्याने वैतागून जाऊन एका पुणेकराने दारावर पाटीच लावली की ‘आमचे नाव मतदारयादीत नाही, तरी आमचा व आपला वेळ वाया घालवू नये.’ ही पाटी पाहून उमेदवार हळूच काढता पाय घेत, दुसऱ्या घराची बेल वाजवित आहेत. पुणेरी टोमणे म्हणून सध्या व्हॉट्सअ‍ॅपवर एक पाटी फिरत आहे. प्रचाराची पत्रके लावून भिंत विद्रुप करणाऱ्यांना यामध्ये चांगलाच इशारा दिला आहे. ‘ही खासगी सोसायटी असून, कुठल्याही उमेदवाराचे भिंतीवर पोस्टर लावलेले दिसल्यास त्या फोटोवर गंध लावून हार घातला जाईल.’ आपली ही पाटी फाडली जाईल हे लक्षात घेऊन ‘हा कागद फाडून टाकल्यास आमच्याकडे याच्या सहा झेरॉक्स तयार आहेत’ असा इशाराही सेक्रेटरीच्या नावाने दिलेला या पाटीत दिसतो. पुण्याच्या मध्यभागात कधीच न दिसणाऱ्या उमेदवारांना काही पाट्यांद्वारे चांगलेच टोमणे मारले आहेत. यापूर्वी याच पद्धतीच्या ‘नगरसेवक गायब’ नावाने फलक लावण्यात आले होते. आता प्रचारात नगरसेवक दिसू लागल्याने ‘नगरसेवक सापडले, ते पुन्हा आपल्या भेटीला आलेत’ असे फलक लावलेले दिसून येत आहेत.