शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

डाळी पुन्हा कडाडल्या

By admin | Updated: September 3, 2016 20:53 IST

मागील आठवड्यापर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येवू लागलेल्या डाळी पुन्हा कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात तुरडाळीसह हरभरा डाळीनेही शंभरीचा टप्पा ओलांडला आहे

- ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 3 - मागील आठवड्यापर्यंत सर्वसामान्यांच्या आवाक्यात येवू लागलेल्या डाळी पुन्हा कडाडल्या आहेत. घाऊक बाजारात तुरडाळीसह हरभरा डाळीनेही शंभरीचा टप्पा ओलांडला आहे. आठवडाभरात दोन्ही डाळींचे भाव क्विंटलमागे दीड ते दोन हजार रुपयांनी वाढले. परिणामी किरकोळ बाजारातही डाळींचे भाव पुन्हा जैसे थे झाले आहेत. 
 
गुलटेकडी येथील मार्केटयार्डातील घाऊक बाजारात मागील वर्षभर शंभरीच्या पुढे गेलेल्या तुरडाळीने दहा दिवसांपुर्वी दीड वर्षांतील भावाचा नीचांक गाठला होता. हे भाव क्विंटलमागे ७५०० ते ८५०० रुपयांपर्यंत खाली आले होते. मार्च २०१५ मध्ये तुरडाळीचे भाव क्टिंटलमागे सुमारे ८५०० ते ८००० रुपये एवढे होते. त्यामुळे पुढील काही दिवसांत हे भाव आणखी घसरण्याची शक्यता व्यापाºयांनी व्यक्त केली होती. मात्र, प्रत्यक्षात तुरडाळीसह हरभरा, मुगडाळ व मटकी डाळीचे भाव पुन्हा वाढू लागले आहेत. मागील काही महिन्यांत बाजारात डाळींचे आवक मोठ्या प्रमाणावर होत होती. केंद्र व राज्य शासनाच्या विविध प्रयत्नांमुळे भावही आटोक्यात येवू लागले होते. त्यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात डाळी उपलब्ध झाल्या होत्या. त्यामुळे शासनाच्या ९५ रुपये प्रति किलो भावाच्या तुरडाळीकडेही ग्राहकांनी पाठ फिरवली होती. 
 
सद्यस्थितीत डाळींचा साठा कमी होवू लागल्याने साठेबाजांनी पुन्हा साठेबाजी करण्यास सुरूवात केली आहे. त्यामुळे जागेवरच डाळींचे भाव वाढले आहेत. मात्र, आठवडाभरात अपेक्षेपेक्षा अधिक भाववाढ झाली आहे. दि. ३० आॅगस्टपर्यंत भाव कमी होत चालले होते. त्यानंतर मात्र, भावाने अचानक उसळी घेतली. पुढील काही दिवस ही भाववाढ कायम राहण्याची शक्यता व्यापारी विजय राठोड यांनी व्यक्त केली. 
 
घाऊक बाजारात सध्या तुरडाळीचे भाव क्विंटलमागे ९५०० ते १०, ७०० रुपये तर हरभरा डाळीचे ९२०० ते १०,२०० रुपयांपर्यत गेले आहेत. आठवडाभरापासून दररोज भावात सातत्याने वाढ होत असल्याने तुलनेने १५०० ते २००० हजार रुपयांनी डाळी महागल्या आहेत. पुढील एक-दोन आठवडेही डाळींसाठी तेजीचे राहणार आहेत. त्यामुळे किरकोळ बाजारावरही याचा परिणाम होणार असून दुकानदारांकडून वाढीव भावाने ग्राहकांना डाळींची विक्री केली जाण्याची शक्यता आहे. 
 
तीन आठवड्यांतील डाळींचे भाव (क्विंटलमागे रुपयांत) 
दि. २० ऑगस्ट दि. २७ ऑगस्ट दि. ३ सप्टेंबर 
तुरडाळ ८५००-१०००० ७५००-८५०० ९५००-१०७०० 
हरभराडाळ ९०००-९६०० ८०००-८५०० ९२००-१०२०० 
मुगडाळ ६५००-७००० ६०००-६२०० ६५००-७००० 
मसुरडाळ ६८००-६९०० ६७००-६८०० ६६००-६७०० 
मटकीडाळ ८०००-८२०० ७०००-७२०० ७५००-८०००