शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

पावसाने पालघर झाले जलयुक्त शिवार

By admin | Updated: June 28, 2016 03:07 IST

पालघर शहरामध्ये पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने पालघर नगरपरिषदेची पोलखोल केली आहे.

पालघर : पालघर शहरामध्ये पडलेल्या पहिल्याच मुसळधार पावसाने पालघर नगरपरिषदेची पोलखोल केली आहे. कोटयावधी रूपये गटार बांधणी व सफाई वर खर्च करणाऱ्या नगरपालिकेच्या क्षेत्रातील भागात अनेक ठिकाणी पाणी साचले तर काही लोकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे पालघर शहराला जलयुक्त शिवाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. पालघर नगरपालिका क्षेत्रातील मैला व घाण वाहून नेण्यासाठी माहीम रोड वर बांधण्यात आलेल्या गटारींसाठी ३ कोटी ९८ लाख रूपये कचेरी रोड वरील गटार उभारणीसाठी १ कोटी ८० लाख तर जगदंबा हॉटेल ते टेंभोडे रोड दरम्यान गटार बांधण्यासाठी १ कोटी ९८ लाख असा सुमारे ८ कोटीची निधी खर्च करण्यात येत आहे. परंतु योग्य नियोजनाचा अभाव, व्यक्ती तसा न्याय ही प्रवृत्ती व मालकांना विश्वासात न घेता जमीन ताब्यात घेण्याची बेकायदेशीर प्रवृत्ती, इ. अनेक कारणामुळे गटार बांधणीची कामे अपुऱ्या अवस्थेत पडून आहेत. त्यामुळे पाऊस पडताच गटारीत तुंबलेली सर्व घाण रस्त्यावर येऊ लागली आहे. तसेच शहरात पडलेल्या पावसाचा निचरा होण्याचा व वाहुन जाण्याचा मार्गच मिळत नसल्याने या घाण पाण्याने शहरातील अनेकांच्या घरात शिरकाव केला आहे. त्यामुळे लोकमान्य नगर, काळे मार्ग, स्ततर गाळा, खाणपाडा, विष्णूनगर, मोहपाडा, इ. भागातील अनेक घरात पाणी शिरले. विद्यमान नगरसेविका डॉ. उज्वला काळे यांच्या घरातही पाणी शिरल्याने नगरपरिषदेने पावसाळयापूर्वी केलेल्या गटार सफाईचा दावा फोल ठरल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)>गटार सफाईवर उधळपट्टीपालिकेने २०११-१२ मध्ये गटार सफाईसाठी २१ लाख ५७ हजार , २०१२-१३ , ३३ लाख २५ हजार , २०१४-१३ साली ६६ लाख ४३ हजार, २०१४-१५ ,७२ लाख २६ हजारांचा खर्च केला आहे. गटारे सफाईसाठी ३१/१०/२०१५ च्या सर्व साधारण सभेमध्ये ठेकेदाराला १५ लाख २६ हजार रूपयाचे देयक देण्याबाबतची अवैध मंजूरी घेतली.पाण्याचा निचरा व्हावा म्हणून नगरपालिकेवर जेसीबी वापरण्याची पाळी ओढावली आहे.