शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकांना पुन्हा डावलले

By admin | Updated: December 7, 2015 02:10 IST

मराठी साहित्य संमेलनादरम्यान साहित्यप्रेमी आणि प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांमध्ये महत्त्वाचा दुवा असणाऱ्या साहित्य महामंडळाने यंदाही डावलल्याची भावना प्रकाशकांमध्ये आहे

पुणे : मराठी साहित्य संमेलनादरम्यान साहित्यप्रेमी आणि प्रकाशक, पुस्तक विक्रेत्यांमध्ये महत्त्वाचा दुवा असणाऱ्या साहित्य महामंडळाने यंदाही डावलल्याची भावना प्रकाशकांमध्ये आहे. घुमान साहित्य संमेलनात प्रकाशकांच्या अडचणी समजून घेऊ, असे लेखी आश्वासन देऊनही ते महामंडळाने न पाळल्याने प्रकाशक, पुस्तकविक्रेत्यांचा अपमान झाल्याचे बोलले जात आहे.संत नामदेव महाराज यांची कर्मभूमी असलेल्या घुमान येथे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा साहित्य महामंडळाने निर्णय घेतल्यानंतर प्रकाशक आणि पुस्तक विक्रेत्यांनी नाराजी व्यक्त करीत काही मुद्दे उपस्थित केले होते. विविध प्रश्न उपस्थित करून साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता.संयोजन समितीमध्ये प्रकाशक परिषदेचे २ प्रतिनिधी घेऊ, असे हैदराबादला झालेल्या महामंडळाच्या बैठकीनंतर प्रकाशन परिदषदेला लेखी पत्राद्वारे कळविण्यात आले. पण पिंपरी-चिंचवडला होणाऱ्या ८९व्या संमेलनाच्या आयोजनातही परिषदेच्या प्रतिनिधींचा समावेश न केल्याने प्रकाशकांमध्ये नाराजी आहे. संमेलनाच्या स्टॉल वाटपाला सुरुवात झाली आहे, पण आयोजक अथवा महामंडळाने प्रकाशक परिषदेशी संपर्क साधलेला नाही. महामंडळ प्रकाशकांना ठरवून डावलत आहे. त्याचप्रमाणे स्टॉलचे भाडे ४ हजारांवरून ५ हजार रुपये झाल्याचे प्रकाशक परिषदेचे अनिल कुलकर्णी यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. संमेलनाच्या आयोजकांच्या प्रतिनिधींनीही प्रकाशकांशी चर्चा करू असे म्हटले होते, पण कुणीही चर्चा केली नसल्याचे ते म्हणाले.पिंपरीच्या संमेलनासाठी स्टॉल नोंदणीला सुरुवात झाली आहे. पण प्रकाशक, विक्रेत्यांना स्टॉल कसे उभारले जातील, तेथे काय सुविधा असतील, याचीही माहिती महामंडळाने दिलेली नाही. स्टॉलच्या संख्येवरही बंधन घातल्याचे कुलकर्णी यांनी सांगितले. (प्रतिनिधी)