शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

प्रकाशकांची ‘घुमानवारी’ नाहीच...

By admin | Updated: January 24, 2015 01:35 IST

पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा काही प्रकाशकांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला.

पुणे : पंजाबच्या घुमान येथे होणाऱ्या ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सहभागी न होण्याचा काही प्रकाशकांनी शुक्रवारी पुनरुच्चार केला. महाराष्ट्रातच विभागीय साहित्य संमेलन घेण्याबाबत कोणत्याच हालचाली न झाल्याने घुमानला जाण्यास इच्छुक नसल्याचे या प्रकाशकांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.संमेलनासाठी आलेल्या निमंत्रणापैकी उस्मानाबादचा विचार न करता साहित्य संमेलन पंजाबमधील घुमान या गावी घेण्याचा निर्णय महामंडळाने जाहीर केल्यानंतर राज्य प्रकाशक परिषदेने काही महिन्यांपूर्वी रीतसर पत्रकार परिषद घेऊन या निर्णयाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. घुमान येथे मराठी भाषिकांची संख्या खूप कमी आहे त्यामुळे या भागात ग्रंथप्रदर्शनाच्या माध्यमातून पुस्तकांची विक्री होणार नसल्याने या भागात केवळ ‘विभागीय संमेलन’ घ्यावे आणि समांतर साहित्य संमेलन उस्मानाबादमध्ये घ्यावे, अशी मागणी त्यांनी केली होती. या संदर्भातील रीतसर पत्रही प्रकाशक परिषदेने महामंडळाला दिले होते.यासंबंधी स्वागताध्यक्ष आणि महामंडळाच्या अध्यक्षांकडे माध्यमांकडूनही वारंवार विचारणा केली असता यावर मध्यम तोडगा काढण्यात येईल, असे सांगण्यात येत होते. त्यानुसार साधकबाधक चर्चेमध्ये महाराष्ट्रात विभागीय संमेलन घेण्याचा तोडगा काढण्यात आला. मात्र त्यावर कोणत्याच हालचाली झाल्या नाहीत. (प्रतिनिधी)