शहरं
Join us  
Trending Stories
1
BJP New President: भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष महिला? निर्मला सितारामन यांच्यासह 'ही' ३ नावे चर्चेत!
2
One Big Beautiful Bill Passed : डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा विजय, अमेरिकेच्या संसदेत 'वन बिग ब्यूटीफुल बिल' मंजूर; नेमकं काय आहे यात?
3
Today Daily Horoscope: कोणत्या राशीला आज धनलाभाचा योग? जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
4
‘लोकमत सरपंच अवॉर्ड’ विजेत्या गावांना प्रत्येकी २५ लाख; ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा
5
रायकर पाड्यातील विद्यार्थ्यांचा शाळेत जाण्यासाठी जीवघेणा प्रवास; वैतरणा नदी तराफ्यावरून करावी लागते पार
6
पुणे हादरले : घरात घुसून तरुणीवर बलात्कार, तिच्याच मोबाइलवर काढले फोटो ; संगणक अभियंता तरुणी राहात होती उच्चभ्रू सोसायटीत
7
उद्धव-राज : जुन्या जखमांचा हिशेब कसा होणार?
8
यूपीतील शेतकऱ्यांच्या नावे नांदेडमध्ये पीक विमा; ४० सुविधा केंद्र चालकांवर गुन्हा; त्यात ९ जण परळीचे
9
दलाई लामांना ड्रॅगन-विळखा
10
कार चालकाची चूक असल्यास भरपाई मिळणार नाही; सर्वोच्च न्यायालयाने दिले निर्देश
11
लंडनची डॉक्टर मैत्रीण पोलिसांच्या रडारवर; दादरमधील अत्याचार प्रकरणातील शिक्षिकेच्या वैद्यकीय चाचण्या पूर्ण; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी
12
बनावट लेटरहेडद्वारे आमदार निधी लाटल्याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; आ. प्रसाद लाड यांच्या तक्रारीवरून तपास सुरू
13
टेस्टमध्ये फुटबॉलचं ट्विस्ट! हॅरी ब्रूकनं खांद्यानं उडवला स्टंपवरचा चेंडू; आधी पंतनं केली टाइमपास करतोय अशी तक्रार, मग...
14
"भारताने पाकिस्तानी एअरबेसवर 11 क्षेपणास्त्रे डागली, अल्लाहतालाने..."; इस्लामिक स्कॉलर्ससमोर पाकिस्तानचं रडगाणं!
15
ENG vs IND : भेदक मारा अन् 'स्लिप'मध्ये जागता पहारा! टीम इंडियानं उडवली यजमान इंग्लंडची झोप
16
मराठीवरून मविआत फूट? काँग्रेसला बोलावले नाही, आता ठाकरेंच्या मेळाव्याला शरद पवार जाणार नाहीत
17
शुबमन गिलनं उद्ध्वस्त केला ४६ वर्षांपूर्वीचा 'महा रेकॉर्ड'; गावसकर, सचिन, द्रविड अन् शास्त्रींना मागे टाकत बनला 'NO.1'
18
ENG vs IND : बुमराहच्या अनुपस्थितीत आकाश दीपचा "मैं हूँ ना...शो"! दोन्ही शतकवीरांच्या पदरी भोपळा
19
ENG vs IND : कमबॅकसाठी टीम इंडियानं उभारला धावांचा डोंगर; पहिल्या डावात फक्त एकाच गोष्टीची खंत!
20
जे कधी नाही जमलं ते टीम इंडियानं करून दाखवलं; जड्डू अन् वॉशिंग्टनसह गिलनं उचलला सिंहाचा वाटा

प्रकाशकांच्या बहिष्कारावर लवकरच तोडगा!

By admin | Updated: February 9, 2015 05:10 IST

घुमानच्या साहित्य संमेलनाकडे प्रकाशकांनी नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. कारण मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्रकाशकांशिवा

बालासाहेब काळे, हिंगोलीघुमानच्या साहित्य संमेलनाकडे प्रकाशकांनी नफा-तोट्याच्या पलीकडे जाऊन पाहिले पाहिजे. कारण मराठी भाषेची सेवा करणाऱ्या प्रकाशकांशिवाय साहित्य व्यवहार पूर्ण होऊ शकत नाही. याबाबत लवकरच बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला जाईल़ प्रकाशकांनी बहिष्काराची भूमिका मागे घ्यावी, असे आवाहन ८८व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ़ सदानंद मोरे यांनी रविवारी केले़ डॉ. मोरे यांनी संत नामदेव महाराज यांच्या जन्मस्थळी नर्सी येथे रविवारी भेट दिली. संत नामदेवांचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो असून, या पवित्र स्थळी येण्याची इच्छा संमेलनाच्या योगामुळे पूर्ण झाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.डॉ़ मोरे म्हणाले, संत नामदेवांची कर्मभूमी असलेल्या घुमानला राष्ट्रीय तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी संमेलनाध्यक्ष या नात्याने आपण केंद्र सरकारकडे केली आहे. त्याचबरोबर संत नामदेवांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या गावांमधील वास्तूंची नीट व्यवस्था व्हावी, नर्सीतील प्रस्तावित सातमजली राष्ट्रीय स्मारकाचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी आपण पाठपुरावा करू, असेही त्यांनी स्पष्ट केले. साहित्य संमेलने म्हणजे रिकामटेकड्यांचा उद्योग असे म्हणणारे भालचंद्र नेमाडे यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ़ मोरे यांची प्रतिक्रिया विचारली असता, नेमाडे यांची भूमिका वेगळी असू शकते. मात्र साहित्यिक म्हणून मी त्यांचा आदरच करतो. म्हणून बातमी समजल्याबरोबर त्यांचे अभिनंदन केले, असे ते म्हणाले. बेळगावात मराठी माणसांची होणारी मुस्कटदाबी ब्रिटिशकाळातील राज्यकर्त्यांची कटू आठवण जागवणारी असून, हा प्रकार निषेधार्ह असल्याचे ते म्हणाले. घुमान येथे मराठी माणसांचे वास्तव्य नसल्याने संमेलनाध्यक्षांचे विचार सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी अध्यक्षीय भाषण विविध भाषांमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे. त्यासाठी भाषणाचे इंग्रजी, हिंदी, पंजाबी आदी भाषांमध्ये अनुवाद करण्यात येणार असल्याची माहिती संमेलनाचे स्वागताध्यक्ष भारत देसडला यांनी दिली.