शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

तटकरेंच्या पुस्तकाचे प्रकाशन : फडणवीसांच्या अनुपस्थितीची चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2017 04:07 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे.

अतुल कुलकर्णी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या पुस्तक प्रकाशनाला येण्याचे कबूल करूनही आयत्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कार्यक्रमाला गैरहजर राहिल्यावरून राजकीय चर्चा रंगली आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलेली टीका आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेली निदर्शने यामुळे राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली.विशेष म्हणजे त्याच कार्यक्र मात शरद पवार यांनी महाराष्ट्र राजकीय दृष्टीने सुसंस्कृत आहे, राजकीय अभिनिवेश बाजूला ठेवून एकमेकांच्या सुखदु:खात सहभागी होण्याची परंपरा फक्त याच राज्यात आहे, असे सांगितले. राष्ट्रवादीचे एक नेते म्हणाले, मुख्यमंत्र्यांना जर कार्यक्रमाला यायचेच नव्हते तर आधीच नकार दिला असता तरीही चालले असते. मात्र त्यांनी कार्यक्रम स्वीकारलेला असताना ऐनवेळी येण्याचे रद्द केले. आधी मुख्यमंत्री नांदेडहून निघाल्याची बातमी आली पण त्यांचे विमान औरंगाबादला उतरले तेव्हा मुख्यमंत्री येणार नाहीत हे स्पष्ट झाले. तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी तर तटकरे संकटात असूनही हिमतीने उभे आहेत, असे आपल्या भाषणात सांगितले. पण हे सांगण्याचे ते व्यासपीठ नव्हते, असेही तो नेता म्हणाला. राजकीय लढाया लढण्याची व्यासपीठे वेगळी असतात, याचे भान भाजपाने दाखवले नाही, शरद पवार यांनी ज्या भावना भाषणात मांडल्या त्याउलट कालचे राजकीय चित्र होते, असेही तो नेता म्हणाला.उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला जातच आहात तर तटकरेंना क्लीन चिटही देऊन टाका, असा सल्ला दिला होता. त्यामुळे शिवसेनेचे कोणीही मंत्री या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. खा. संजय राऊत आले होते. त्यांना स्टेजवर बसण्याची विनंती आयोजकांनी केली. पण राऊत यांनी त्यास नकार देत खाली श्रोत्यांमध्ये बसणे पसंत केले होते.भाजपाने मात्र आम्ही आमचे तीन-चार प्रमुख मंत्री पाठवले होते. त्यामुळे याचे राजकीय भांडवल करू नये असे म्हटले आहे. अंजली दमानिया यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे पण त्यांच्या कथित आंदोलनाला मुख्यमंत्री न येण्याने दमानिया मोठ्या झाल्या अशी खोचक टिपणीही राष्ट्रवादीच्या नेत्याने केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस