शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्याचे प्रकाशन

By admin | Updated: January 30, 2017 03:23 IST

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला.

पणजी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते रविवारी गोवा विधानसभा निवडणुकीच्या पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित झाला. भाजपाने जाहीरनाम्यात पुढील पाच वर्षांत गोवा बेरोजगारमुक्त करण्याचा संकल्प सोडला आहे. पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला जाईल. गृहआधार, दयानंद सामाजिक सुरक्षा आदी सामाजिक योजनांचा आर्थिक लाभ महागाई निर्देशांकानुसार देण्याचे आश्वासन देण्यात आले आहे.गोव्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर आदी उपस्थित होते. भाजपाने पाच वर्षांत गोव्याला सक्षम नेतृत्वाखाली स्थिर सरकार दिले. आता दुसरी इनिंग आहे. अपुरी कामे पूर्ण करणार आहोत. त्यामुळे काठावरचे बहुमत नको तर दोन-तृतियांश बहुमत गोव्यातील जनतेने भाजपाला द्यावे, असे आवाहन फडणवीस यांनी केले.तरंगते कॅसिनो काँग्रेस सरकारने आणले. भाजपाने विरोध केल्यामुळे संख्या सहावर अडली. कॅसिनोंना हाकलणे अशक्य आहे. कॅसिनोंमुळे मांडवी नदीत प्रदूषण होणारनाही, याची दक्षता घेत आहोत.ते अन्यत्र हलविण्यासाठी पर्यायी जागाही शोधत आहोत, असे गोव्याचे मुख्यमंत्री पार्सेकर यांनी सांगितले. केजरीवालांविरुद्ध गुन्हा नोंदविणारभाजपा व काँग्रेसकडून पैसे घेऊन गोव्यात आम आदमी पार्टीला मते देण्याच्या आवाहनामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला जाणार आहे. निवडणूक आयोगाने पोलिसांना तसा आदेश दिला आहे. झंझावाती प्रचार विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी महाराष्ट्रातील नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री तथा भाजपाचे गोवा प्रभारी नितीन गडकरींनी दोन दिवस राज्यात दौरा करत सावर्डे, शिरोडा, फोंडा, काणकोण, केपे आदी ठिकाणी जाहीर सभा घेतल्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या रविवारी तीन सभा झाल्या. स्वतंत्रपणे निवडणूक लढविताना राष्ट्रवादीने ४० जागांपैकी १७ जागांवर उमेदवार उभे केले आहे.