शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
6
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
7
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
8
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
9
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
10
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
11
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
12
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
13
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
14
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
15
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
16
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
17
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
18
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
19
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
20
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी

संरक्षण क्षेत्रात पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप सर्वोत्तम-जेटली

By admin | Updated: May 28, 2017 17:37 IST

संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे

ऑनलाइन लोकमतपुणे, दि. 28 - संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. संशोधन आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादन या दोन बाबी महत्वाच्या आहेत. परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. यासाठी संरक्षण क्षेत्रात ह्यपब्लिक प्रायव्हेटह्ण पार्टनरशिप हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी केले.ह्यडिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजीह्ण (डीआयएटी) अभिमत विद्यापीठाच्या नवव्या पदवीप्रदान समारंभात जेटली बोलत होते. संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) सचिव आणि डीआयएटीच्या संचालक परिषदेचे अध्यक्ष डॉ.एस.ख्रिस्तोफर आणि कुलगुरु डॉ. सुरेंद्र पाल यावेळी उपस्थित होते. विविध विद्याशाखांतील गुणवंत विद्यार्थ्यांना जेटली यांच्या हस्ते पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.जेटली म्हणाले, ह्यदेशाच्या स्वातंत्र्यापासून गेली ७० वर्षे आपल्याला शेजारी देशाची डोकेदुखी झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा देशासमोरील महत्वाचा प्रश्न असून, भारताला सीमांचे संरक्षण करताना होणारी अंतर्गत घुसखोरी आणि दहशतवाद अशा दोन पातळीवरच्या लढायांना एकाचवेळी सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी सरकारची धोरणे प्रतिबंध करत होती. मात्र, परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली आहे. विविध विद्याशाखांमध्ये उच्च दर्जाचे संशोधनाचे काम सुरु आहे. त्याला गती देत काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा. भारतीय तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात, ही आपली जमेची बाजू आहे.ह्ण देशातील उत्तम शैक्षणिक संस्था, कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याआधारे भारताला संरक्षण उत्पादनाचे केंद्र बनवू शकतो. जेटली म्हणाले, ह्यभारतीय अर्थव्यवस्था शेतीशी जोडली गेली आहे. अजूनही मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ ते १६ टक्के वाटा कृषी क्षेत्राचा आहे. शेतक-यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेणे, हे एक आव्हान आहे. शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे. वाढते नागरिकीकरण, बदलते राहणीमान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रभावी वापर यामुळे भारत प्रगतीच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारत जगातील सर्वाधिक वेगाने महासत्तेकडे झेपावणारा देश झाला आहे. इतिहासाने दिलेली ही संधी गमावता कामा नये, यादृष्टीने संरक्षण स्वयंपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले, ह्यसंस्थेची प्रगती ही संशोधन करणा-या विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते. त्यामध्ये डीआयएटीने आपले कर्तृत्व सिध्द केले आहे. डॉ. सुुरेंद्र पाल यांनी प्रास्ताविक केले.