शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

संरक्षण क्षेत्रात ‘पब्लिक प्रायव्हेट’ पार्टनरशिप सर्वोत्तम

By admin | Updated: May 29, 2017 04:25 IST

संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे, यावर भर देण्यात आला

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : संरक्षण क्षेत्रामध्ये स्वयंपूर्ण होण्यासाठी संरक्षण साहित्य आणि शस्त्रास्त्रांची निर्मिती देशामध्येच झाली पाहिजे, यावर भर देण्यात आला आहे. संशोधन आणि संरक्षण उपकरणांचे उत्पादन या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. यासाठी संरक्षण क्षेत्रात ‘पब्लिक प्रायव्हेट’ पार्टनरशिप हा सर्वोत्तम पर्याय आहे, असे प्रतिपादन संरक्षणमंत्री अरुण जेटली यांनी रविवारी पुण्यात केले.‘डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स टेक्नॉलॉजी’ (डीआयएटी) अभिमत विद्यापीठाच्या नवव्या पदवी प्रदान समारंभात जेटली बोलत होते. ते म्हणाले, स्वातंत्र्यापासून गेली ७० वर्षे आपल्याला शेजारी देशाची डोकेदुखी झाली आहे. राष्ट्रीय सुरक्षा हा देशासमोरील महत्त्वाचा प्रश्न असून, भारताला सीमांचे संरक्षण करताना होणारी अंतर्गत घुसखोरी आणि दहशतवाद अशा दोन पातळीवरच्या लढायांना एकाच वेळी सामोरे जावे लागत आहे. यापूर्वी सरकारची धोरणे प्रतिबंध करत होती. मात्र, परदेशातील ज्ञानावर अवलंबून राहण्यापेक्षा स्वयंपूर्णतेवर भर देण्यात आला आहे. त्यासाठी तंत्रज्ञान हीच गुरुकिल्ली आहे. विविध विद्याशाखांमध्ये उच्च दर्जाचे संशोधनाचे काम सुरू आहे. त्याला गती देत काळानुरूप आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवायला हवा. भारतीय तंत्रज्ञान लवकर आत्मसात करतात, ही आपली जमेची बाजू आहे. देशातील उत्तम शैक्षणिक संस्था, कुशल मनुष्यबळ आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर याआधारे भारत संरक्षण उत्पादनाचे केंद्र बनवू शकतो.वाढते नागरिकीकरण, बदलते राहणीमान आणि तंत्रज्ञानाच्या विकासाचा प्रभावी वापर यामुळे भारत प्रगतीच्या दिशेने गतीने वाटचाल करत आहे. गेल्या तीन वर्षांमध्ये भारत जगातील सर्वाधिक वेगाने महासत्तेकडे झेपावणारा देश झाला आहे. इतिहासाने दिलेली ही संधी गमावता कामा नये, यादृष्टीने संरक्षण स्वयंपूर्णतेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, असेही जेटली यांनी नमूद केले.उत्पादन आणि सेवा क्षेत्रात कामाची गरजभारतीय अर्थव्यवस्था शेतीशी जोडली गेली आहे. अजूनही मोठी लोकसंख्या शेतीवर अवलंबून असून, सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या १५ ते १६ टक्के वाटा कृषी क्षेत्राचा आहे. शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडून घेणे, हे एक आव्हान आहे. शेतीवर अवलंबून राहण्यापेक्षा उत्पादन आणि सेवा क्षेत्रामध्ये काम करण्याची गरज आहे.