शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

साहित्य संमेलनासाठी कोटींच्या उड्डाणास लोकप्रतिनिधी तय्यार

By admin | Updated: April 29, 2016 04:00 IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याकरिता किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित

कल्याण : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन करण्याकरिता किमान दोन ते अडीच कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून कल्याणमध्ये संमेलन घेण्याची मागणी करणाऱ्या सार्वजनिक वाचनालयाच्या मागे खंबीरपणे उभे राहून संमेलन यशस्वी करून दाखवू, असा विश्वास कल्याण-डोंबिवलीचे प्रथम नागरिक राजेंद्र देवळेकर आणि अन्य काही आमदारांनी व्यक्त केला.कल्याण सार्वजनिक वाचनालयाची मागणी अत्यंत रास्त आहे. कल्याण-डोंबिवलीमधील साहित्य रसिक गेली अनेक वर्षे संमेलनाची प्रतीक्षा करीत असल्याने यावेळी ही मागणी स्वीकारून तो मान आम्हाला द्यावा, अशी भावना येथील लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली.महापौर राजेंद्र देवळेकर म्हणाले की, वाचनालयाने साहित्य संमेलनाची मागणी केली असून कल्याणसारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक ओळख असलेली नगरी संमेलन झाले तर तो दुग्धशर्करा योग असेल. सार्वजनिक वाचनालयाचा एकमेव अर्ज प्राप्त झालेला असल्याने मसापच्या कार्यकारिणीच्या नागपूर येथे होणाऱ्या बैठकीत वाचनालयाच्या मागणीचा सकारात्मक विचार होणे आवश्यक आहे. कल्याण हे वाहतुकीच्या दृष्टीने जंक्शन आहे. याठिकाणी सगळ््या प्रकारच्या वाहन प्रवासाची सुविधा उपलब्ध आहे. तसेच शहरात चांगली हॉटेल्स आहेत. त्यामुळे आलेल्या साहित्यिकांची चांगली व्यवस्था कल्याणमध्ये होऊ शकते. साहित्य संमेलन कल्याणला दिल्यास ते चांगल्या प्रकारे पार पाडू. त्यात कोणतीही त्रूटी राहणार नाही असा मला विश्वास वाटतो. कल्याण पश्चिम मतदार संघाचे भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी सांगितले की, कल्याण नगरीत साहित्य संमेलन दिले तर तो आमच्या शहराचा गौरवच ठरणार आहे. हे संमेलन चांगल्या प्रकारे पार पाडण्याकरीता सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील. कल्याणनगरीत साहित्याचा जागर होणे आवश्यक आहे. त्यामुळे साहित्य संमेलन कल्याणला देण्याचा विचार साहित्य संमेलन कार्यकारिणीने करावा. यापूर्वी दोन वेळा फिल्म फेस्टीवल यशस्वीरित्या आयोजित केला होते. भव्य कार्यक्रम आयोजनाचा अनुभव आमच्या गाठीशी आहे. (प्रतिनिधी)