शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

लोकसेवकांची चौकशी संमतीशिवाय नाही!

By admin | Updated: June 10, 2015 01:41 IST

ग्रामपंचायतींचे सरपंच ते मुख्यमंत्र्यांपर्यंतचे लोकनियुक्त पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या चौकशीपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती आता घ्यावी लागणार आहे.

मुंबई : ग्रामपंचायतींचे सरपंच ते मुख्यमंत्र्यांपर्यंतचे लोकनियुक्त पदाधिकारी, सरकारी कर्मचारी आणि अधिकारी यांच्या चौकशीपूर्वी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती आता घ्यावी लागणार आहे. त्यासाठी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम १५६(अ)मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या मंगळवारच्या बैठकीत घेण्यात आला. यापूर्वी कोणत्याही लोकसेवकाविरुद्ध न्यायालयात तक्रार दाखल झाल्यानंतर फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३च्या १५६(३) व कलम १९०नुसार दंडाधिकारी हे संबंधित लोकसेवकाच्या चौकशीचे थेट आदेश देऊ शकत असत. अशा आदेशानंतर पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात येत असे. प्रामाणिक लोकसेवकांना त्याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागल्याचीही उदाहरणे होती. सर्वोच्च न्यायालयाने अनिलकुमार विरुद्ध एम.के. अयप्पा या प्रकरणातील सुनावणीत कलम १५६(३) व कलम १९०मध्ये सुधारणा करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार मंत्रिमंडळाने आज निर्णय घेतला. आता लोकसेवकाच्या व्याख्येत मोडणाऱ्या प्रत्येक पदाच्या चौकशीस संमती देणारे सक्षम प्राधिकारी (कॉम्पिटंट अ‍ॅथॉरिटी) कोण असतील, हे राज्य सरकार निश्चित करेल. त्यासंबंधीचे विधेयक येत्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार आहे. त्याला विधिमंडळाने मान्यता दिली तर ते अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठविले जाणार आहे. लोकसेवक कर्तव्यावर असताना काही गुन्हा घडला असेल तर त्याच्या चौकशीसाठी सक्षम प्राधिकाऱ्याची संमती घ्यावी, अशी तरतूद कलम १९७मध्ये आधीपासूनच होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची अंमलबजावणी करावी लागणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. आजच्या निर्णयाने काही शंकांना वाव मिळाला आहे. सक्षम प्राधिकाऱ्याला संमतीचे अधिकार हे चौकशी टाळण्यासाठी वा मुद्दाम चौकशी लावण्यासाठी वापरले जाणार नाहीत ना, अशी शंका आहे. चौकशी टाळण्यासाठी वा ती करण्यासाठी सत्तापक्षाकडून दबावही येऊ शकतो. राजपत्रित अधिकारी महासंघाने आजच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ऊठसूट चौकशी लावण्यास या निर्णयाने चाप बसेल, असे महासंघाचे नेते ग.दि. कुलथे म्हणाले. (विशेष प्रतिनिधी)राज्यपालांचे अधिकार कायममंत्री, आमदारांच्या चौकशीला संमती देण्याचे अधिकार राज्यपालांना आहेत. नवीन व्यवस्थेत या दोघांबाबत सक्षम प्राधिकारी तेच असतील, असेही सूत्रांनी स्पष्ट केले.