शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वे पोलीस 'या' मुलाच्या माध्यमातून करणार जनजागृती

By admin | Updated: November 6, 2016 11:52 IST

रेल्वेतून प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणा-यांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आता जनजागृती करणार आहेत.

ऑनलाइन लोकमत मुंबई, दि. 6 - रेल्वेतून प्रवासादरम्यान स्टंटबाजी करणा-यांना परावृत्त करण्यासाठी रेल्वे पोलीस आता जनजागृती करणार आहेत. रेल्वे पोलिसांना जनजागृतीसाठी एक मुलगा सापडला आहे. विशेष म्हणजे जनजागृती करणारा मुलगा हा स्वतः स्टंटबाजी करताना बचावला आहे. दरम्यान, 30 ऑक्टोबरला चर्चगेटकडे जाणाऱ्या लोकलमधून चर्नी रोड स्टेशनवर 17 वर्षीय युवकाचा स्टंटबाजी करतानाचा हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला. यानंतर रेल्वे पोलिसांनी या मुलाचा शोध घेतला. आता त्याच्याच माध्यमातून स्टंटबाजांना रोखण्यासाठी रेल्वे पोलीस जनजागृती करणार आहेत. आलम खान असं या मुलाचं नाव असून, तो भाईंदर पूर्वेला राहतो. रेल्वेच्या प्रवासादरम्यान दरवाज्यावर उभा असलेल्या आलमला रेल्वेच्या खांबाचा धक्का लागून तो खाली पडला होता. याचदरम्यान त्यानं स्वतःचा एक व्हिडीओ शूट केला होता. त्यावेळी अनेकांना वाटलं की त्याचा त्या अपघातात मृत्यू झाला. मात्र तो जिवंत असून, रेल्वे पोलिसांनी त्याचा शोध लावला आहे.