शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघातापासून बचावासाठी नागपूर महानगरपालिकेकडून जनजागृती

By admin | Updated: May 18, 2016 20:24 IST

उपराजधानीला उन्हाचा जोरदार तडाखा बसत असून नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस पारा तापलेलाच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे

ऑनलाइन लोकमतनागपूर, दि. १८ : उपराजधानीला उन्हाचा जोरदार तडाखा बसत असून नागरिक उकाड्याने अक्षरश: हैराण झाले आहेत. पुढील काही दिवस पारा तापलेलाच राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांच्या आरोग्याला फटका बसू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. मनपाकडून उष्माघात प्रतिबंधात्मक उपाययोजना हाती घेण्यात आल्या असून ३० जूनपर्यंत हा आराखडा आरोग्य व उद्यान विभागामार्फत राबविला जाणार आहे. उपाययोजना राबविण्याची जबाबदारी झोन कार्यालयांवर सोपविण्यात आली आहे. सेवाभावी संस्था, बँका, स्थानिक लोकप्रतिनिधी यांच्या सहभागातून शहराच्या विविध भागात २३६ प्याऊ सुरू करण्यात आले आहेत.

उष्माघात होऊ नये यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. रेल्वे स्टेशन, स्टारबस डेपो, स्टार बसेस, महापालिके ची कार्यालये, आॅटो यावर जनजागृतीचे स्टीकर्स लावण्यात आले आहेत. शहरातील झोपडपट्ट्यात प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. तसेच रामनवमी, हनुमान जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रथयात्रातही आरोग्य विभागाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. उपाययोजना संदर्भात झोन कार्यालयांना मुख्यालयांना दररोज माहिती पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. पिण्याच्या पाण्याचे प्याऊ सुरू करण्यासाठी सेवाभावी संस्थांना आवाहन केले होते. याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. उष्माघातासंदर्भात शहरातील झोपडपट्ट्यांत जनजागृती केली जात आहे. उद्याने दिवसभर राहणार खुली४३ अंश सेल्सिअसपेक्षा अधिक तापमान असल्यास नागरिकांना थंड विसावा मिळावा यासाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत उद्याने उघडे ठेवून पिण्याचे पाणी उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या आहेत. काही उद्यानात सामाजिक संस्थांनी प्याऊ सुरू केले आहेत. उष्माघातापासून बचाव करण्यासाठी जनजागृतीवर भर देण्यात आला आहे. यासाठी प्रशिक्षणासोबतच सार्वजनिक ठिकाणी व आॅटोवर स्टीकर लावण्यात आल्याची माहिती आरोग्य विभागातील डॉ. विजय जोशी यांनी दिली. ११०० लोकांना प्रशिक्षणउष्माघातापासून बचाव करण्यासाठी करावयाच्या उपायोजनांची माहिती व्हावी, यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत जनजागृती केली आहे. यात ११०० लोकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यात वाहतूक पोलीस, अंगणवाडी सेविका, आरोग्य विभागातील कर्मचारी व इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.उष्माघात टाळण्यासाठी उपाययोजना ज्या दिवशी नागपूर शहराचे तापमान ४३ अंश सेल्सिअस पेक्षा अधिक असेल त्या दिवशी उन्हात जाऊ नये, डोक्याला कापड बांधावे. भरपूर थंड पाणी प्यावे व उन्हात काम करण्याचे टाळावे. उष्माघात झाल्यास तातडीने उपचार घ्यावे. गरज भासल्यास १०८ क्रमांकावर फोन करून अ‍ॅम्बुलन्सची मदत घ्यावी, अशा सूचना मनपाकडून देण्यात आल्या आहेत.