शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
2
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
4
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
5
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
6
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
7
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
8
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
9
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
10
मुत्सद्देगिरी आणि सैन्यदलांचं निर्विवाद यश!
11
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
12
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
13
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
14
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
15
चंद्रावर उमटणार भारतीय अंतराळवीराचे पदचिन्ह
16
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा
17
रोहितने ‘तो’ निर्णय तेव्हाच घेतलेला? गंभीर आलेला, पण रोहित शर्मा अनुपस्थित होता... 
18
रोहित शर्माने घेतली कसोटीतून तडकाफडकी निवृत्ती; इंग्लंड दौऱ्यात मिळणार होता डच्चू...
19
गोष्ट मिठी नदीच्या न उपसलेल्या गाळाची..., गाळाने भरले भ्रष्ट अभियंत्याचे खिसे; चौकशीतून स्पष्ट 
20
उद्धव ठाकरे ‘धनुष्यबाणा’साठी पुन्हा सक्रिय; याचिकेवर सुनावणी घेण्याची मागणी

महावितरणकडून गणेशोत्सवात वीजवापराबाबत जनजागृती

By admin | Updated: September 18, 2015 00:53 IST

गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी

पुणे : गणेशोत्सवात विना परवाना वीज वापरली जात असल्यामुळे सर्वात जास्त तोटा होत असेल तर महावितरणचा. त्यातून वाचण्यासाठी सोशल मिडीयाच्या माध्यमातून त्यांनी नामी शक्कल लढवली आहे. विजेपासून काही आपत्ती निर्माण झाली तर काय काळजी घ्यायची या माहितीबरोबरच परवानगी घेऊन वीज वापरा असे आवाहन करणारे एक निवेदनच त्यांनी व्हाटस् अ‍ॅप व अन्य माध्यमातून जारी केले आहे. उत्सवाच्या काळात बहुसंख्य मंडळे विद्यूत रोषणाईसाठी महावितरणची वीज वापरत असतात. त्यांच्यातील अगदीच मोजकी मंडळे त्यासाठी अधिकृतपणे परवानगी घेतात. त्यामुळे उत्सवाच्या कालावधीत महावितरणची वीज तर खर्च होते, मात्र त्याचे शुल्क काही त्यांना मिळत नाही. बराच मोठा तोटा त्यांना यामुळे उत्सव काळात सहन करावा लागतो. सोशल मिडियाच्या माध्यमातून त्यांनी यावर उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला आहे.गणेश मंडळांसाठी असलेल्या विजेचे दरच त्यांनी त्यांच्या निवेदनात जाहीर केले आहे. त्यानुसार मंडळांना फक्त ३ रूपये २७ पैसे प्रति युनिट या दराने वीज पुरवठा केला जातो. घरगुती विजेसाठीचा दर ३ रूपये ३६ पैसे प्रति युनिट व पथदिव्यांसाठीचा दर ४ रूपये २७ पैसे आहे. त्या तुलनेत मंडळांसाठीचा दर कमी असून त्यामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊनच उत्सवासाठी वीज वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे. याचबरोबर या निवेदनात विजेच्या तारा तुटल्यास काय काळजी घ्यायची याचीही माहिती दिली आहे. सर्व महावितरण अधिकारी व कर्मचारी अशा नावाने हे निवेदन व्हॉटस् अ‍ॅप वरील विविध ग्रुप्सना तसेच फेसबुकवरही पाठवण्यात आले आहे. (प्रतिनिधी) - सध्या पाऊस सुरू आहे, अशा काळात विजेचा शॉक बसणे, तारा तुटुन पडणे असे प्रकार होत असतात. तसे होऊ नयेत यासाठी आधीच काळजी घ्यावी व दुर्दैवाने काही प्रकार घडलेच तर त्वरीत महावितरणच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, तेथील दुरध्वनी क्रमांक मंडळाच्या दर्शनी भागावर लिहावेत असे आवाहन करण्यात आले आहे. - काही आपत्ती निर्माण झाली तर काय काळजी घ्यायची या माहितीबरोबरच परवानगी घेऊन वीज वापरा - मंडळांसाठीचा दर कमी असून सर्व मंडळांनी अधिकृत परवानगी घेऊनच वीज वापरावी असे आवाहन महावितरणने केले आहे.