शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पं.पुरुषोत्तम कासलीकर यांचे निधन

By admin | Updated: August 26, 2014 00:58 IST

अमोलकचंद महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे माजी विभाग प्रमुख ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पं.पुरुषोत्तम बाबाराव कासलीकर यांचे येथे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते.

यवतमाळ : अमोलकचंद महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे माजी विभाग प्रमुख ख्यातकीर्त शास्त्रीय गायक पं.पुरुषोत्तम बाबाराव कासलीकर यांचे येथे सोमवारी वृध्दापकाळाने निधन झाले. ते ८७ वर्षांचे होते. शास्त्रीय संगीताचा परंपरागत वारसा लाभलेले पं.पुरुषोत्तम कासलीकर हे स्वरराज छोटागंधर्व यांचे पट्टशिष्य होते. त्यांचा जन्म यवतमाळात १८ आॅगस्ट १९२८ रोजी झाला. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी संगीत साधनेला प्रारंभ केला. स्वरराज छोटा गंधर्व, राम मराठे आणि त्यांचे ज्येष्ठ बंधू पं.मनोहरराव कासलीकर यांच्याकडून त्यांनी शास्त्रीय व नाट्यसंगीताचे धडे घेतले. मूळ यवतमाळचे असलेल्या कासलीकरांनी शास्त्रीय संगीताचा अविरत प्रसार केला. अनेक शिष्य त्यांनी घडविले. यवतमाळच्या अमोलकचंद महाविद्यालयात संगीत विभाग प्रमुख म्हणून त्यांनी दिलेली सेवा अविस्मरणीय अशीच आहे. यवतमाळ नगरपरिषदेच्यावतीने स्थापन करण्यात आलेल्या म्युनिसिपल शाळेत त्यांनी ४० वर्षे गायनशाळा चालविली. तसेच गांधर्व विद्यालयाची शाखा स्थापन करून त्याचे प्रमुखपदही सांभाळले.महाराष्ट्रासह अहमदाबाद, पोरबंदर, इंदोर या ठिकाणी त्यांच्या शास्त्रीय संगीताच्या मैफिली गाजल्या. आकाशवाणी आणि दूरदर्शनचे ते मान्यताप्राप्त कलावंत होते. संगीत अलंकार या उपाधीने अलंकृत प.कासलीकर यांना २०११-१२ मध्ये महाराष्ट्र शासनाचा राज्यस्तरीय सांस्कृतिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले होते. विदर्भासह राज्यात त्यांचा मोठा शिष्य परिवार असून यवतमाळच्या संगीत क्षेत्रातील सर्वात मोठे नाव होते. पं.कासलीकर यांच्या मागे कन्या राजश्री सागर भानावत आहे. मंगळवारी २६ आॅगस्टला सकाळी ११ वाजता त्यांची अंत्ययात्रा दर्डानगरस्थित निवासस्थानावरून निघेल. पांढरकवडा मार्गावरील मोक्षधामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहे. त्यांच्या निधनाने यवतमाळच्या संगीत क्षेत्रात शोककळा पसरली आहे. (नगर प्रतिनिधी)