शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
4
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
5
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
6
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
7
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
8
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
9
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
10
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
11
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
12
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
13
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
14
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
15
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
16
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
17
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
18
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
19
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
20
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्या रोखण्यासाठी मानसोपचाराची मदत

By admin | Updated: September 26, 2015 03:03 IST

विदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करण्यासाठी सरकारने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली असून, त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे

विश्वास पाटील, कोल्हापूरविदर्भ व मराठवाड्यातील आत्महत्याग्रस्त १४ जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करण्यासाठी सरकारने मानसोपचार तज्ज्ञांची नेमणूक केली असून, त्यासाठी साडेसात कोटींचा निधी मंजूर केला आहे. यापूर्वीही काँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असाच प्रयत्न झाला होता; परंतु त्यानंतरही आत्महत्यांचे सत्र थांबलेले नाही.शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी विशेष मदतीचा कार्यक्रम शासनाने हाती घेतला आहे. या प्रकल्पास ‘पे्ररणा प्रकल्प-शेतकरी मानसिक आरोग्य सेवा कार्यक्रम’ असे संबोधण्यात येणार आहे. त्यानुसार औरंगाबाद, जालना, हिंगोली, बीड, नांदेड, लातूर, अकोला, यवतमाळ, वाशिम, परभणी, उस्मानाबाद, अमरावती, बुलडाणा व वर्धा या जिल्ह्यांत शाश्वत आरोग्य सेवा देण्यात येणार आहेत. या कार्यक्रमांतर्गत बीड, बुलडाणा, हिंगोली, जालना, उस्मानाबाद, परभणी, वाशिम आणि वर्धा येथील जिल्हा रुग्णालयांत व अकोला, औरंगाबाद, नांदेड, लातूर आणि यवतमाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात मानसोपचार कक्षाचे विस्तारीकरण करण्यात येणार आहे. या उपक्रमाबद्दल शेतकरी संघटनेचे नेते विजय जावंधिया यांना विचारले असता ते म्हणाले, की शेतकऱ्यांचे मानसिक प्रबोधन करणे म्हणजे आत्महत्येचा विषय दुसरीकडेच वळविणे होय. नैसर्गिक संकटे वाढत आहेत. शेतकऱ्यांचे जगणे अधिक खर्चाचे होत आहे आणि बाजारातील अनिश्चितीमुळे त्याचा तोटा वाढत आहे. यंदाच्या हंगामात विदर्भातील शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकासाठी एकरी १० ते १५ हजार रुपये खर्च केले आहेत आणि ते पीक वाया गेले आहे. जुने कर्ज फेडल्याशिवाय नवे कर्ज मिळणार नाही व ते फेडायचे कसे, याचे उत्तर शेतकऱ्यांजवळ नाही. असे असताना प्रबोधनाने काय साधणार, असा सवालही जावंधिया यांनी केला.