शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

१५० कोटींच्या निधीची तरतूद

By admin | Updated: February 26, 2016 01:08 IST

केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भातील महत्त्वाच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या नव्या रेल्वेमार्गासाठी १५० कोटींची तरतूद करून सर्वाधिक वर्दळीच्या

- दयानंद पाईकराव,  नागपूरकेंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी सादर केलेल्या रेल्वे अर्थसंकल्पात विदर्भातील महत्त्वाच्या वर्धा-यवतमाळ-नांदेड या नव्या रेल्वेमार्गासाठी १५० कोटींची तरतूद करून सर्वाधिक वर्दळीच्या नागपूर-वर्धा मार्गावर चौथ्या नव्या मार्गाच्या कामाला मंजुरी दिली आहे. याशिवाय अजनी रेल्वेस्थानकाला सॅटेलाइट टर्मिनलच्या रूपाने विकसित करण्याची घोषणा केली असून, या प्रकल्पाची किंमत ४१.६२ कोटी रुपये आहे.प्रभू यांनी विदर्भातील जुन्या प्रकल्पांसाठी भरघोस निधी उपलब्ध करून दिलेला आहे. ‘लोकमत’च्या एडिटोरीयल बोर्डाचे चेअरमन खासदार विजय दर्डा यांनी वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वेमार्गासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी १५० कोटी रुपयांची तरतूद केल्यामुळे, हा प्रकल्प मार्गी लागला आहे. नागपूर-सेवाग्राम या मार्गावर सध्या अप आणि डाउन या दोन रेल्वेलाइन आहेत. या रेल्वे रुळाची क्षमता १०० रेल्वेगाड्या चालविण्याची असताना, येथून १५० रेल्वेगाड्या चालविण्यात येत आहेत. त्यामुळे येथे तिसऱ्या मार्गाची घोषणा करण्यात आली होती, परंतु तिसरा आणि चौथ्या मार्गासाठी जवळपास तेवढाच खर्च येत असल्यामुळे, अर्थसंकल्पात नागपूर-वर्धा चौथ्या मार्गाची घोषणा करण्यात आली आहे. या अर्थसंकल्पात दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात सुरू असलेल्या जबलपूर-गोंदिया या नव्या रेल्वेमार्गासाठी २२३ कोटी रुपये, छिंदवाडा-नागपूर ब्रॉडगेजसाठी १५० कोटी रुपये, नागपूर-नागभीड ब्रॉडगेजसाठी २५ कोटी, कळमना-नागपूर डबलिंगसाठी १० कोटी, दुर्ग-राजनांदगाव डबलिंगसाठी ५६ कोटी, राजनांदगाव-नागपूर तिसऱ्या मार्गासाठी १६० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.