शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

तरतूद दोन हजार कोटींची घोषणा सात हजार कोटींच्या

By admin | Updated: December 12, 2014 01:57 IST

भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदत देण्यासाठी पुरवणी मागण्यात 2 हजार कोटींची तरतूद दाखविली आहे.

नागपूर : भाजप-शिवसेना युती सरकारने राज्यातील दुष्काळग्रस्त शेतक:यांना मदत देण्यासाठी  पुरवणी मागण्यात 2 हजार कोटींची तरतूद दाखविली आहे. पॅकेजमध्ये मात्र 7 हजार कोटींच्या मदतीची घोषणा केली आहे. हा शेतक:यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार, माजी मंत्री छगन भुजबळ, जयंत पाटील तसेच काँग्रेसचे गटनेते राधाकृष्ण विखे पाटील, काँग्रेेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, पतंगराव कदम आदींनी गुरुवारी पत्रकारांशी बोलताना केला.
राज्यातील 19 हजारांहून अधिक गावातील पैसेवारी 5क् पैशापेक्षा कमी आहे. पैसेवारी कमी असलेल्या सर्वच गावांना मदतीची गरज आहे. परंतु पॅकेजमध्ये मराठवाडा व विदर्भातील दुष्काळग्रस्त भागासाठीच मदतीची घोषणा केलेली आहे. वास्तविक खरीप हंगाम बुडाल्याने प्रतिहेक्टरी 25 हजार तर ओलिताच्या शेतीला 5क् हजारांची मागणी केली. पीक कर्ज माफ करण्याची मागणी केली होती. तिही मान्य केलेली नाही. केवळ पीक कर्जावरील व्याज माफ करण्याची घोषणा केली आहे. जुन्याच योजना एकत्रित करून पॅकेजची घोषणा करण्यात आल्याचा आरोप अजीत पवार यांनी केला. यावर बोलण्याची संधी द्यावी, अशी मागणी विधानसभा अध्यक्षांकडे केली परंतु त्यांनी संधी नाकारली. सोलर पंपासाठी तरतूद कोण करणार. शेतक:यांना तातडीने रोख रक्कम किती मिळणार हेही स्पष्ट केले नसल्याचे त्यांनी सांगितले.
पॅकेजमध्ये सोयाबीन, कापूस, धान व फळबागांना मदत मिळण्याची अपेक्षा होती. तसेच दूध उत्पादक शेतक:यांसाठी घोषणा होईल, अशी आशा होती.  (प्रतिनिधी)
 
दुष्काळमुक्तीचा जुनाच अजेंडा
कर्जावरील व्याज माफी, कर्जाचे पुनर्गठन, वीज बील माफी यापूर्वीही दिली आहे. युती सरकारने पॅकेजमध्ये तीन महिन्याचेच वीज माफ दिली आहे.  आम्ही 1क् हजार कोटींच्या पॅकेजची मागणी केली होती. परंतु ती नाकारली. आघाडीच्या काळात दुष्काळमुक्तीसाठी राबविलेल्या जुन्याच अजेंडय़ाची युती सरकारने पॅकेजमध्ये घोषणा केल्याचा टीका राधाकृष्ण विखे-पाटील  व डॉ. पतंगराव कदम यांनी यांनी केली.
कोकणाला काहीच नाही
राज्यात  भाजप-शिवसेना सत्तेत सहभागी असूनही पॅकजेमध्ये कोकणाला काहीच दिले नाही. या भागातील शेतक:यांवर अन्याय केला. सत्तेत असूनही न्याय मिळत नसेल तर त्यांना लोकांना का निवडून द्यावे, असा प्रश्न नितेश राणो यांनी केला.