शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांसाठी तरतूद भरीव!

By admin | Updated: March 19, 2017 02:34 IST

मोठमोठे आकडे आणि आकर्षक शब्दयोजना हे गत काही वर्षांपासून अर्थसंकल्पीय भाषणांचे वैशिष्ट्य झाले आहे. जनतेला अपेक्षा असलेल्या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद

- रवी टाले

मोठमोठे आकडे आणि आकर्षक शब्दयोजना हे गत काही वर्षांपासून अर्थसंकल्पीय भाषणांचे वैशिष्ट्य झाले आहे. जनतेला अपेक्षा असलेल्या प्रत्येक क्षेत्रासाठी भरीव तरतूद केल्याचे चित्र अर्थसंकल्पात रंगविलेले असते. वर्षाच्या अखेरीस मात्र त्या क्षेत्राची स्थिती ‘जैसे थे’ असल्याचा प्रत्यय येतो. रस्ते हे त्याचे सर्वांगसुंदर उदाहरण! अगदी गुळगुळीत नव्हे, तरी किमान खड्डेमुक्त रस्ते मिळण्याची अपेक्षा जनता वर्षानुवर्षांपासून करीत आहे; मात्र रस्त्यांवर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता आहे, याचा शोधच तिच्या नशिबी लिहून ठेवलेला आहे. रस्त्यांबद्दल बोलायचे झाले, की जॉन एफ. केनेडी यांचे वाक्य उद््धृत करायचे, हा जणू काही शिरस्ताच झाला आहे. त्याला जागत जनतेला दर्जेदार रस्ते उपलब्ध करून देण्यासाठी भरीव तरतुदी केल्याचा दावा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी २०१६-१७ च्या अर्थसंकल्पीय भाषणात केला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागासाठीची तरतूद गतवर्षीच्या सुमारे साडेचार हजार कोटींवरून सात हजार कोटी रुपयांपर्यंत वाढविण्यात आली आहे. ही वाढ कागदावर घसघशीत भासत असली, तरी ती रस्त्यांवर उतरणार का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. त्याशिवाय हायब्रिड अ‍ॅन्युइटीमध्ये ३० हजार कोटी रुपये एवढ्या अंदाजित किमतीची १९५ कामे प्रस्तावित करण्यात आली असून, त्यासाठी चालू वर्षी साडेतीन हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. वाहनधारकांकडून एकरकमी रस्ते कर वसूल केल्यानंतरही त्यांना टोल टॅक्सरूपी खंडणी देण्यास भाग पाडणाऱ्या बीओटी-टोल मॉडेलनंतरचे हायब्रिड अ‍ॅन्युइटी हे नवे मॉडेल आहे. बीओटी-टोल मॉडेलच्या आधी बीओटी-अ‍ॅन्युइटी हे मॉडेल चलनात आणण्यात आले होते. हायब्रिड अ‍ॅन्युइटी हे त्या दोघांचा सुवर्णमध्य साधणारे चांगले मॉडेल आहे, असे म्हणता येईल. दर्जा टिकविण्याचे आव्हानअर्थसंकल्पात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या निधीतून प्रत्येक रस्त्याच्या किमान दहा किलोमीटर लांबीच्या देखभाल दुरुस्तीचे काम प्रस्तावित करण्यात आले आहे. ही स्वागतार्ह तरतूद असली तरी मूळ प्रश्न कायम आहे-प्रत्यक्षात काय होणार? याशिवाय केंद्रीय मार्ग निधीतून किती लांबीच्या रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत, किती पुलांची कामे सुरू आहेत, याचा गौरवपूर्ण उल्लेख मुनगंटीवार यांनी भाषणातून केला. केवळ राज्य मार्गाला राष्ट्रीय महामार्ग घोषित केल्याने काम भागत नसते, तर त्याचा दर्जाही उंचवावा लागतो, हे त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. रस्त्यांची अवस्था ‘माय जेऊ घालत नाही अन् बाप भीक मागू देत नाही’, अशी होऊ लागली आहे.