शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण जोडण्यासाठी साडे चारशे कोटी रुपयांची तरतूद - एकनाथ शिंदे

By दीपक शिंदे | Updated: August 27, 2022 22:28 IST

सातारा जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करण्याची ग्वाही

सातारा - राज्यातील पश्र्चिम महाराष्ट्र आणि कोकण या दोन विभागात  पर्यटनासाठी मोठा वाव आहे. त्यामुळे हे दोन्ही विभाग जोडण्यासाठी सुमारे ४५० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

महाबळेश्वर येथील राजभवन मध्ये आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. पत्रकार परिषदेस जिल्हधिकारी रूचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा,पोलिस अधिक्षक अजयकुमार बन्सल, महाबळेश्वर नगरपालिका मुख्याधिकारी पल्लवी पाटील, तहसीलदार सुषमा पाटील आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील आपटी ते तापोळासाठी १५० कोटी आणि कास ते बामनोलीसाठी ३०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यामुळे पर्यटनाला मोठा वाव मिळणार आहे. त्यासाठी एमटीडीसी आणि एमआयडीसीच्या विभागीय अधिकाऱ्यांची नव्याने नियुक्ती करण्यात येणार आहे. याचा पर्यटन आणि उद्योग वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.ते पुढे म्हणाले, महाबळेश्वर येथे पार्किंगची समस्या असून दोन ठिकाणी पार्किंगची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच  महाबळेश्वरच्या सुशोभीकरणासाठी उर्वरित निधी देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सोळशी येथे साडे सहा टीएमसी धरण बांधण्यासाठी सर्व्हे करण्याच्याही सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. हे पाणी दुष्काळी भागासाठी देण्यात येणार आहे.

प्रतापगडाचे सुशोभीकरण करण्यासाठी निधी देण्यात आला असून प्रतापगडसाठी सुकानु समितीही नेमली आहे. दुर्गम भागातील लोक आणि विद्यार्थ्यांसाठी छोट्या मिनी बस देण्यात येणार आहेत. बोट क्लबला रीतसर परवानगी देणे,बार्ज खरेदी करणे, बेल एअर साठी ३ कोटीचा निधी, स्मार्ट प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी निधी, इको सेन्सिटिव्ह झोन मधील गावांचा विकास, महाबळेश्वर मधील स्ट्रॉबेरी साठी तज्ञ लोकांची नेमणूक करून नवीन तंत्रज्ञान विकसित करणे आणि जिल्ह्याच्या विकासासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. 

सर्वांच्या टीकांना कामाने उत्तर देणारराज्यामध्ये सध्या अनेक जण एकमेकांवर टीका करत आहेत. मात्र मी कोणावरही टीका करणार नाही तर सर्वांच्या ठिकाणांना कामाने उत्तर देईल अशा प्रकारचा अर्थविश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदे