शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध कलावंतांच्या मानधनासाठी तरतूद ठरली अपुरी

By admin | Updated: December 15, 2015 03:56 IST

राज्यातील वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांना शासकीय योजनेतून मानधन देण्यात येते. परंतु या योजनेसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूदच अपुरी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर

- योगेश पांडे, नागपूरराज्यातील वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांना शासकीय योजनेतून मानधन देण्यात येते. परंतु या योजनेसाठी करण्यात आलेली अर्थसंकल्पीय तरतूदच अपुरी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर कलावंत व साहित्यिकांचे मानधन प्रलंबित असल्याची कबुली राज्य शासनाने दिली आहे. यासंदर्भात अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याबाबत प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील वृद्ध कलावंत तसेच साहित्यिकांना देण्यात येणारे मानधन प्रलंबित असल्याबाबत अ‍ॅड.निरंजन डावखरे यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी दिलेल्या लेखी उत्तरात वरील कबुली देण्यात आली आहे. वृद्ध कलावंतांना मानधन योजना १९९५ पासून राबविण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत दरवर्षी प्रत्येक जिल्ह्यातील ६० कलावंतांची मानधनासाठी निवड करण्यात येते. सध्या अ वर्ग कलावंतास २ हजार १०० रुपये, ब वर्ग कलावंतास १ हजार ८०० आणि क वर्ग कलावंतास पंधराशे रुपये इतके मानधन अदा करण्यात येते. राज्य शासनाकडून सिने अनुदान जाहीर झालेल्या चित्रपटांनादेखील अनुदान देण्यात येते. परंतु अशा २० चित्रपटांना अनुदान मिळालेलेच नाही. शिवाय वृद्ध कलाकार व साहित्यिकांना मानधन देण्याबाबतच्या पुरवणी मागणीचा योजनेत्तर प्रस्ताव वित्त विभागाने नामंजूर केला. यामुळे कलावंतांचे मानधन प्रलंबित आहे. खर्चाचे नियमन व नियंत्रण करण्यासाठी उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीला काही प्रमाणात मर्यादा घालण्यात येत आहे. परंतु चित्रपट अनुदान व कलावंतांचे मानधन यासाठी या मर्यादा शिथिल करून वित्त विभागास प्रस्ताव सादर करण्यात आला होता. हा प्रस्ताव जुलै २०१५ च्या पावसाळी अधिवेशनात विधिमंडळास सादर करण्यात येणार होता. परंतु तो वित्त विभागाने नामंजूर केला. यामुळे हे चित्रपट व कलाकार यांना अद्यापही आर्थिक साहाय्य मिळालेले नाही, असे तावडे यांच्या उत्तरात नमूद आहे.शासनाचे प्रयत्न सुरूचित्रपट अनुदानासाठी तसेच वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन योजनेअंतर्गत अर्थसंकल्पीय तरतूद अपुरी पडली असली तरी यासंदर्भात शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. अतिरिक्त तरतूद उपलब्ध करून देण्याची कार्यवाही सुरू असल्याचे तावडे यांनी स्पष्ट केले. २०१४-१५ या कालावधीत नव्याने पात्र ठरलेल्या एकूण २४ जिल्ह्यातील ३ हजार ७७८ कलावंतांच्या मानधनासाठी ६ कोटी ९१ लाख रुपयांची पुरवणी मागणी सांस्कृतिक कार्यमंत्र्यांनी प्रस्तावित केली आहे.