शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

योजनांची माहिती वेबसाइटवर द्या

By admin | Updated: April 2, 2017 01:25 IST

राज्य सरकारची सर्व खाती आणि महापालिकांनी त्यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती एका विवक्षित प्रारूपामध्ये ३० एप्रिलपर्यंत

मुंबई : राज्य सरकारची सर्व खाती आणि महापालिकांनी त्यांच्यातर्फे राबविल्या जाणाऱ्या सर्व कल्याणकारी योजनांची माहिती एका विवक्षित प्रारूपामध्ये ३० एप्रिलपर्यंत आपापल्या वेबसाइटवर उपलब्ध करून द्यावी, असा आदेश मुख्य माहिती आयुक्त रत्नाकर गायकवाड यांनी दिला आहे.संबंधित खात्याने ही माहिती देताना कल्याणकारी योजनेचे नाव, तिची ठळक वैशिष्ट्ये, त्यासाठी अंदाजपत्रकात करण्यात आलेली तरतूद आणि अपेक्षित लाभार्थींची संख्या, पात्रता निकष, अर्जाचा नमुना, अर्ज प्राप्त झाल्याची व मंजूर झाल्याची तारीख आणि अर्ज नाकारला असल्यास त्याची थोडक्यात कारणे इत्यादी तपशीलही त्यात असावा, असे माहिती आयोगाने सांगितले आहे. माजी केंद्रीय माहिती आयुक्त शैलेश गांधी यांनी केलेल्या अर्जावर हा आदेश देण्यात आला. ‘हकदर्शक’ ही स्वयंसेवी संस्था माहिती अधिकारान्वये अशी माहिती घेऊन ती सामान्यांना सहज समजेल अशा प्रकारे उपलब्ध करून देत असते. संस्थेने अशा प्रकारे एकेका खात्याकडे अर्ज करून माहिती घेऊन ती प्रसिद्ध करण्याऐवजी सरकारने स्वत:हूनच ही सर्व माहिती उपलब्ध केल्यास लोकांची मोठी सोय होईल. त्यामुळे आयोगाने तसा आदेश द्यावा, अशी विनंती गांधी यांनी केली होती.योग्य माहितीअभावी सामान्य लोक या योजनांविषयी अनभिज्ञ असतात. त्यामुळे त्यांना या योजनांचा अपेक्षेनुसार लाभ घेता येत नाही. शिवाय जनजागृती नसल्याने भ्रष्टाचार आणि गैरव्यवहारांनाही वाव मिळतो. त्यामुळे अशी माहिती वेबसाइटवर उपलब्ध करणे गरजेचे आहे, असेही मुख्य माहिती आयुक्तांनी नमूद केले. (विशेष प्रतिनिधी)