शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

साखर निर्यातीसाठी तातडीने अनुदान द्या - पवार

By admin | Updated: January 16, 2015 06:23 IST

सध्या उसदराचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारमधील मंडळीच तोडफोड करू लागली आहेत. आपण मंत्री असताना तीनवेळा साखर निर्यातीला अनुदान देऊन बाजारभाव नीट राहील याची काळजी घेतली.

मुंबई: राज्यात सध्या उसदराचा प्रश्न निर्माण झाला असताना सरकारमधील मंडळीच तोडफोड करू लागली आहेत. आपण मंत्री असताना तीनवेळा साखर निर्यातीला अनुदान देऊन बाजारभाव नीट राहील याची काळजी घेतली. आतादेखील या सरकारने निर्यातीचे अनुदान तातडीने सुरू करावे आणि त्यानंतरही जी साखर उरेल त्यासाठी प्रति टन ६०० ते ७०० रुपये अनुदान द्यावे, अशी मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सरकारकडे केली. उसाच्या प्रश्नावर सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलेली वक्तव्ये वाचून ते खूप ज्ञानी असावेत असा माझा समज झाला आहे, असा मार्मिक टोलाही त्यांनी लगावला. किमान वाजवी किंमत न देणाऱ्या साखर कारखान्यांची साखर गोदामे ताब्यात घेतली जातील, असे वक्तव्य सहकारमंत्री पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी केले होते. त्यावर शुक्रवारी पत्रकार परिषद घेऊन पवार यांनी जोरदार फटकेबाजी केली. सहकार आणि पणन विभाग सांभाळणा-या या मंत्र्यांना आता साखर विक्री व वितरण हा नवा विभाग देखील काढून द्यावा असा उपरोधिक सल्लाही त्यांनी दिला. पवार म्हणाले, साखरेची निर्यात थांबल्यामुळे दराचा प्रश्न निर्माण झाला आहे. १२ जानेवारी पर्यंत ३७८ लक्ष ११ हजार टन उसाचे गाळप झाले आहे आणि अद्याप ५०० लक्ष टन उसाचे गाळप होणे बाकी आहे. शेतात उभा असलेला ऊस तातडीने गाळपासाठी घेतला पाहिजे. पण ज्यांनी आजवर या प्रश्नावर संघर्षाचे वातावरण तयार केले, तेच आता शेतकऱ्यांच्या पैशातून उभारलेल्या साखर संकुलावर हल्ला करत आहेत, असा टोमणाही त्यांनी खा. राजू शेट्टी यांना लगावला.सहकारमंत्री पाटील यांनी कधी कोणत्या विषयावर अभ्यासपूर्ण भाषण केल्याचे मी कधीही वाचलेले नाही. मात्र उसाच्या प्रश्नावरुन त्यांनी केलेली विधाने वाचूृन ते खूपच ज्ञानी व्यक्ती आहेत असे मला वाटते. गोदामांमधील साखर सरकार ताब्यात घेईल असे ते म्हणाल्याचे मी वाचले आहे. त्यांनी हे काम तातडीने करावे, जेणे करुन गोदामे रिकामी होतील. चांगला भाव येईपर्यंत साखर सांभाळण्याचा खर्च वाचेल सरकारने ती साखर विकून जो पैसा येईल त्यातून वर्षभर कारखान्यांचा खर्च सरकारनेच भागवावा, असा उपरोधिक सल्लाही पवार यांनी दिला. (विशेष प्रतिनिधी)