शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकांसाठी तरतूद करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2016 04:35 IST

नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा

सांगली : नोटाबंदीमुळे राज्यातील जिल्हा मध्यवर्ती बँकांना दररोज लाखो रुपयांच्या व्याजाचा भुर्दंड सहन करावा लागत आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या अंदाजपत्रकात तरतूद करावी, अशी मागणी माजी ग्रामविकास व अर्थमंत्री जयंत पाटील यांनी शुक्रवारी केली. सहकारी क्षेत्रावर अविश्वास दाखवून ज्या राष्ट्रीयीकृत व नागरी बँकांच्या व्यवस्थेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वास दाखविला, त्याच व्यवस्थेकडून नोटांच्या बॅगाच्या बॅगा बदलून काळ्याचे पांढरे करण्यात आल्याची टीकाही त्यांनी या वेळी केली. सांगली जिल्हा बँकेच्या कार्यालय नूतनीकरणाचे उद्घाटन पाटील यांच्या हस्ते शुक्रवारी झाले, या वेळी ते बोलत होते. नोटाबंदीचे शेवटचे चार दिवस शिल्लक आहेत. जिल्हा बँकांना नोटा बदलून देण्यास व भरून घेण्यास बंदी घालण्यात आली. त्यामुळे राज्यातील २८ हजार गावांतील जनतेला नोटा बदलण्यासाठी त्रास सहन करावा लागला. सांगली जिल्हा बँकेत ३१५ कोटी रुपये जमा झाले. त्याचा दररोजच्या सहा लाख रुपये व्याजाचा भुर्दंड बँकेला सहन करावा लागत आहे. राज्यातील इतर जिल्हा बँकांची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. आपल्याकडील बँकांची स्थिती भक्कम आहे. पण मराठवाडा, विदर्भातील जिल्हा बँकांची स्थिती पाहता, त्या पुन्हा सुरू होतील की नाही, अशी शंका आहे. (प्रतिनिधी)मोदींनी जाब विचारावा : जयंत पाटीलगेल्या दोन आठवड्यांत नव्याकोऱ्या कोट्यवधींच्या दोन हजार रुपयांच्या नोटांची बंडले सापडू लागली आहेत. सामान्य माणसे बँकेसमोर रांगेत आहेत. त्यांना दोन हजार रुपये देताना बँकांचे हात जड होत आहेत. मग इतक्या मोठ्या प्रमाणात नव्या नोटा बाहेर कशा आल्या? या व्यवस्थेला मोदी जाब विचारणार आहेत का? - जयंत पाटील, माजी मंत्री