शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

न्यायालयांना मूलभूत सुविधा पुरवा

By admin | Updated: November 4, 2016 02:10 IST

मूलभूत सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून दिले नाही तर प्रलंबित असलेल्या केस जलदगतीने निकाली काढल्या जाणार नाहीत.

मुंबई: न्यायालयांसाठी आवश्यक असलेल्या मूलभूत सुविधा व कर्मचारी उपलब्ध करून दिले नाही तर प्रलंबित असलेल्या केस जलदगतीने निकाली काढल्या जाणार नाहीत. केस जलदगतीने निकाली काढण्यासाठी न्यायव्यवस्थेला सहकार्य केले पाहिजे, हे राज्य सरकारला समजायला हवे, असे निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवले. विक्रीकर लवाद बार असोसिएशनने लवादासाठी पुरेशा मूलभूत सुविधा आणि कर्मचारी उपलब्ध नसल्याचे उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठापुढे होती.‘पोलीस ठाणे आणि अन्य सरकारी संस्थांप्रमाणे न्यायव्यस्थेलाही सरकारच्या पाठिंब्याची आवश्यकता असते, हे सरकारच्या लक्षात येईल, अशी अपेक्षा आम्हाला आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.वांद्रे-कुर्ला सरकारी वसाहतीचा पुनर्विकास करण्याबाबत सरकार विचार करत असल्याबद्दल उच्च न्यायालयाने समाधानही व्यक्त केले. त्याशिवाय राज्य सरकारकडे उपलब्ध असलेल्या अतिरिक्त मोकळ्या भूखंडांवर सरकारी कर्मचा ऱ्यांसाठी सदनिका बांधण्याचाही सरकारने विचार करावा, अशी सूचनाही उच्च न्यायालयाने सरकारला केली.‘मनुष्यबळविकास धोरण जसे खासगी क्षेत्रात राबवले जाते तसे ते राज्य सरकारही राबवण्याचा विचार करेल. त्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना जादा तास काम करण्यास प्रोत्सहान मिळेल, असा विश्वास आम्हाला आहे,’ असे खंडपीठाने म्हटले.महाराष्ट्र विक्रीकर लवादाच्या न्यायालयीन सदस्यांची रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील, असे आश्वासन सरकारी वकील व्ही. ए. सोनपाल यांनी उच्च न्यायालयाला दिले. रिक्त पदे भरण्यासंबंधी उच्च न्यायालयाच्या निबंधकांकडून प्रस्ताव सादर करण्यात आला असून आता हा प्रस्ताव विधी व न्याय विभागाकडे पाठवण्यात आला आहे. या प्रस्तावावर मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, अशी माहिती अ‍ॅड. सोनपाल यांनी खंडपीठाला दिली.राज्य सरकारने दिलेली हमी स्वीकारत सरकारला न्यायालयीन सदस्यांच्या घराचा प्रश्नलाही प्राधान्य देण्याची सूचना राज्य सरकारला केली. त्यावर सरकारी वकिलांनी नवीन सरकारी वसाहत घाटकोपर येथे बांधण्यात येत असून यामध्ये १,२२१ सदनिका असणार आहेत. त्यातील काही इमारती बांधून पूर्ण करण्यात आल्या असल्याची माहितीही खंडपीठाला दिली. (प्रतिनिधी)